चंद्रपूर : शहरी भागासह ग्रामीण भागांचाही विकास झाला पाहिजे, ही आपली भूमिका असून त्या दिशेने प्रयत्न सुरू आहे. मागील दोन वर्षात ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देता आला. याचेही मला समाधान आहे. मात्र या भागांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी गाव तिथे सभागृह ही संकल्पना राबविणार असून प्रत्येक गावात सामाजिक, सांस्कृतिक कार्यांसाठी स्वतंत्र सभागृह उभारण्याचे आश्वासन आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.
शेणगाव येथील विकास कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शेणगावच्या सरपंच पुष्पा मालेकर, उपसरपंच रमेश खवसे, दाताळा सरपंच रवींद्र लोणगाडगे, वचेढा सरपंच किशोर वरारकर, धानोरा सरपंच नंदकिशोर वासाडे, राकेश पिंपळकर, प्रभाकर धांडे, विजय मत्ते, राहुल जेनेकर, विकास तिखट, गणपत कुडे, जंगलू पाचभाई, पंकज गुप्ता, मुन्ना जोगी, रूपेश झाडे, राशिद हुसेन, धनराज हनुमंते, धनंजय ठाकरे, प्रेम गंगाधरे, चंद्रकांत वैद्य, शंकरराव वरारकर, भास्कर नागरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
सभागृहाअभावी छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे प्रत्येक गावाकडे त्यांच्या हक्काचे स्वतंत्र सभागृह असणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
नागरिकांनी हवे ते काम करण्याची आमची भूमिका असून निश्चितच गावातील इतर प्रलंबित कामेही मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. ग्रामविकास निधीतून शेणगाव फाट्यावरील स्वागत द्वारासह शेणगाव येथील सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.