यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, लसीकरणाबाबत पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोविड लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळणाऱ्या भागात जास्त लक्ष केंद्रीत करून नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे. ज्या गावात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही तिथेही लसीकरण करावे. चंद्रपूर मनपासह संबंधित यंत्रणांनी वॉर्डनिहाय नियोजन करून लसीकरणावर भर द्यावा, असा सूचना दिल्या. बैठकीला जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांहून अधिक
सद्यस्थितीत जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर दहापेक्षा जास्त आहे. काॅन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढविली तरच पॉझिटिव्हिटी व मृत्यूदरही कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासण्या कराव्या. उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ४० बेड्स, तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान सात बेड्चे नियोजन कराव, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यंत्रणेला दिले.