नलफडी नाल्यातून मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस रेतीचा उपसा सुरू असतो. याविषयी अनेकदा गावकऱ्यांनी तक्रार केल्या. परंतु कारवाई झाली नाही. बुधवारी पहाटे दोन वाजता गावकऱ्यांनी गाड्या पकडल्या. विरूर ठाणेदार राहुल चव्हाण व उपनिरीक्षक सदानंद वडतकर यांनी तातडीने पाच ट्रॅक्टर ताब्यात घेतले. यातील एक ट्रॅक्टर फरार झाला. यामध्ये ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ एल ७३१६, एमएच ३४ एल ३३१६, एमएच ३४ एल ८७७०, एमएच ३४ एपी ०१४९ व एक नवीन विनाक्रमांकाचा असे एकूण पाच ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या ट्रॅक्टरचे चालक विजय आत्राम, दिवाकर आत्राम, रमेश बोरकुटे, अमोल सोयाम व अतुल टेकाम यांना अटक केली. या प्रकरणात भारतीय दंड विधान कलम ३७९, ५११ व ३४ नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. ठाणेदार राहुल चव्हाण, उपनिरीक्षक सदानंद वडतकर, विजय लांडे, अतुल चहारे, लक्ष्मीकांत खंडाळे यांनी ही कारवाई केली.
रात्री दोन वाजता रेती तस्करांना गावकऱ्यांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:00 AM