आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : तालुक्यातील खेड येथील दुर्गा मेश्राम या २० वर्षीय मुलीचा मृतदेह येथील शिवारातील विहिरीत ९ डिसेंबरला आढळून आले. मात्र अद्यापही पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली नाही. त्यामुळे पोलीस तपासात दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत खेडवासी नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करुन दुर्गाला न्याय देण्यात यावे, या मागणीसाठी गावकऱ्यांनी एसडीपीओ कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले.दुर्गा ८ डिसेंबरला आपल्या बहिणीसोबत खेड येथे नाटक पाहण्यासाठी गेली होती. दरम्यान नाटक सुरु असताना काही वेळासाठी बाहेर पडल्यानंतर गावातील एका युवकाने तिची छेड काढली. मुलीच्या बहिणीने आरडाओरड केल्यानंतर मुलीच्या भावाने छेडखानी करणाºया युवकाला मारहाण केली.या प्रकाराने घरातील मंडळीने रागावले, म्हणून दुर्गा ९ डिसेंबरला सकाळी घरातून निघून गेली. सकाळी रात्री छेडखानी करणाऱ्या त्या मुलाला भेटली, असा आरोप गावकऱ्यांनी निवेदनातून केला. या प्रकरणाची चौकशी करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, एकलव्य सेना जिल्हा अध्यक्ष मिलिंद भन्नारे, तालुकाध्यक्ष स्वप्नील अलगदेवे, बंडू हजारे, बाबुराव बावणे उपस्थित होते.हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी१८ डिसेंबरला न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून पोलिसांना मिळालेल्या अहवालानुसार दुर्गाचा मृत्यू विषारी द्रव प्राशन केल्यामुळे झाला. तरीसुद्धा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल न करता, आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दुर्गाचा मृत्यू सशंयास्पद असून पोलीस या प्रकरणात दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी येथील नागरिकांनी केली.
‘दुर्गा’साठी गावकऱ्यांची एसडीपीओ कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:11 PM
तालुक्यातील खेड येथील दुर्गा मेश्राम या २० वर्षीय मुलीचा मृतदेह येथील शिवारातील विहिरीत ९ डिसेंबरला आढळून आले.
ठळक मुद्देखेड येथील प्रकरण : पोलीस दिरंगाई करीत असल्याचा आरोप