राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील इवलेसे खेडेगाव गुजगव्हाण. ज्या गावाने बालपण दिले. तिथल्या शाळेनेच लिहितावाचता केले. त्या शाळेचा मुख्याध्यापक होण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करून गाव व शाळेच्या ऋणातून मुक्त होता यावे या हेतूने येथे रूजू झालेल्या प्रल्हाद बोरकर यांनी गावात स्वच्छता अभियान राबवून गावाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याकरिता सर्व ग्रामस्थांना एकत्र आणले. प्रल्हाद बोरकर यांनी गावाच्या हृदयात हात घातला. हृदयसंवाद साधत गावाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. स्वच्छतेमुळे मनेही स्वच्छ राहतात. आपली प्रगती होते, हे त्यांनी पटवून दिले. टाळ्यांच्या कडकडाटासह गावकºयांनी दाद दिली आणि कृती कार्यक्रम ठरला. यातूनच सुरेख सुंदर गावासाठी प्रतिज्ञा स्फुरली. जी प्रत्येक गावासाठी प्रेरणादायी ठरु शकेल.चिमूर पं. स. अंतर्गत येत असलेल्या गुजगव्हान या गावातील तुंबलेल्या नाल्यातील साचलेले पाणी गावाच्या आरोग्याला हानीकारक ठरू लागले होते. या पार्श्वभूमीवर गुरुजींनी केलेले ग्रामस्वच्छतेचे आवाहन प्रासंगिक असल्याचे जाणून गावाने स्वच्छतेचा निर्धार केला. एक दिवस गावासाठी देण्याकरिता सारा गाव तयार झाला. स्वच्छ सुंदर गावाची प्रतिज्ञा घेऊन सर्व गावकरी कामाला लागले.गावातून स्वच्छता रॅली काढून जाणीवजागृती करण्यात आली. गावातील सर्व महिला-पुरुष, बालगोपाल ग्रामस्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी झाले आणि गावाला खरे चळवळीचे रुप आले. पाहता-पाहता गाव स्वच्छ चकचकीत झाले. आज गावात एक वेगळे चैतन्य संचारले आहे. गाव स्वच्छ, हागणदारीमुक्त व व्यसनमुक्त गाव झालेच पाहिजे. या जाणिवेतून सर्व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. माजी सरपंच माणिकराव निखाडे यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. पोलीस पाटील युवराज मेश्राम, सरपंच ए.आर.धोटे दुर्योधन दहेकार, प्रमोद पाटील, सुधाकर राजनहिरे उपस्थित होते. श्रमदानातून गावाचा कायापालट होऊ शकतो, याचा वस्तूपाठ गावाने गिरवला. या स्वच्छता अभियानाला सरपंच ए.आर.धोटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुर्योधन दहेकार, प्रमोद पाटील, सुधाकर राजनहिरे, शाळा व्यवस्थापन सदस्य, युवक मंडळ, महिला बचत गट तथा ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गावाला स्वच्छ, सुंदर, हागनदारीमुक्त करून व्यसनमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.
गावकऱ्यांनी घेतली स्वच्छतेची प्रतिज्ञा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:02 PM
तालुक्यातील इवलेसे खेडेगाव गुजगव्हाण. ज्या गावाने बालपण दिले. तिथल्या शाळेनेच लिहितावाचता केले. त्या शाळेचा मुख्याध्यापक होण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करून गाव व शाळेच्या ऋणातून मुक्त होता यावे या हेतूने येथे रूजू झालेल्या प्रल्हाद बोरकर यांनी गावात स्वच्छता अभियान राबवून गावाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याकरिता सर्व ग्रामस्थांना एकत्र आणले.
ठळक मुद्देगाव झाले चकचकीत : स्वच्छतेतून समृद्धीकडे गुजगव्हाणची वाटचाल