कृती संसाधन समितीची मागणी
ब्रम्हपुरी : विधानसभा क्षेत्र निर्माण करताना विकासाच्या दृष्टीने भाैगाेलिक परिस्थितीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. हा विचार करता ब्रम्हपुरी तालुक्यातील काही गावे चिमूर विधानसभा क्षेत्रातून वगळावी, अशी मागणी कृती संसाधन समितीने केली आहे.
तालुक्यातील काेलारी, बेलगाव, ताेरगाव, नांदगाव, नान्हाेरी, दिघाेरी अर्हेर, पिंपळगाव, साेंदरी, सुरबाेडी, हरदाेली, लाडज, चिखलगाव, साेनेगाव, कहाली, खंडाळा, कालेता, चांदली व इतर गावे चिमूर विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असल्याने संबंधित गावांचे रस्ते, पाणीपुरवठा, कृषी, महसूल याेजना, पूरपीडित मदत, आपत्ती व्यवस्थापन यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मुख्यालय दूर असल्याने प्रतिनिधींचे दुर्लक्ष होते. म्हणून सदर गावांना चिमूर विधानसभा क्षेत्रातून वगळून ब्रम्हपुरी क्षेत्रात समाविष्ट करावे, यासाठी कृती संसाधन समिती ब्रम्हपुरीद्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्त्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना नुकतेच निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना ॲड. नंदा फुले, ईश्वर जनबंधू, अंकुश रामटेके, सौरभ सूर्यवंशी, माेतीलाल देशमुख, जयदेव हुमणे, अविनाश डांगे, चक्रेश करंबे, मदन रामटेके, जगदीश निहाटे, साेनाली गजभिये उपस्थित हाेते.