लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही: मागील पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात विविध भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे नद्या, नाले भरून वाहात होते. दरम्यान वातावरणात बदल होऊन कडक ऊन तापायला लागले. त्यामुळे तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून विषमज्वरांचे रुग्ण अधिक आढळून येत आहेत. तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयासह, खासगी रूग्णालये हाऊसफुल्ल दिसून येत आहेत.तीन ते चार दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पाऊस बेपत्ता होऊन ऊन मोठ्या प्रमाणात तापत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये अंगदुखी, डोकेदुखी, हगवण, रक्तपेशीत घट, उलटी होणे, यासारखे लक्षणे असलेल्या रूंग्णाचा समावेश आहे. लहान मुलामध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप दिसून येत आहे. तर मोठ्या माणसामध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबतच डोके दुखणे, डोळे दुखणे, अशक्तपणा, अंगदुखी तीव्र स्वरूप अशाप्रकारचे लक्षणे असणारा ताप दिसून येत आहे. याबाबत डॉक्टरांना विचारले असता, पाणी साठून असलेल्या ठिकाणी लेटटोस्पायरोसिस तर ऊन पडत असल्याने स्वाईन फ्लूचा फैलाव होण्याची शक्यता वर्तविली आहे. सद्या या आजाराचे रूग्ण आढळले नसले तरी मोठ्या प्रमाणात विषमज्वर तापाची साथ असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयासह, खासगी रूग्णालये हाऊसफु ल्ल दिसुन येत आहे. त्यामुळेआजार टाळण्यासाठी दूषित पाणी पिऊ नये, घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावर शौचास बसणे टाळावे, परिसरातील नाले गटाराच्या स्वच्छता करावी, आजारी व्यक्तीना गरम पाणी द्यावे, अतिसार, थंडी,ताप यांसदर्भात आरोग्य सेवकाकडून उपचार करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयामध्ये रोज ५०० रूग्णांची तपासणी केली जाते. २० ते २५ वॉर्डात रुग्णावर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
सिंदेवाही तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:52 PM
मागील पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात विविध भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे नद्या, नाले भरून वाहात होते. दरम्यान वातावरणात बदल होऊन कडक ऊन तापायला लागले.
ठळक मुद्देरूग्णालय हाऊसफु ल्ल : काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन