शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

विश्वास नांगरे पाटील बुधवारी साधणार युवकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:47 PM

महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धार् परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी १६ जानेवारीला संवाद साधणार आहेत. या आयोजनाची जय्यत तयारी जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत सुरू असून या स्पर्धा परीक्षा महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धार् परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी १६ जानेवारीला संवाद साधणार आहेत. या आयोजनाची जय्यत तयारी जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत सुरू असून या स्पर्धा परीक्षा महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सरकारी नोकरीमधील टक्का वाढावा. यासाठी मिशन सेवा हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचे वेगवेगळ्या स्तरावरील प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मिशन सेवा स्पर्धा महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी होणार आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.दिवसभराच्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. दिवसभराच्या या कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी, ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत असणारी संधी, केंद्रीय लोकसेवा आयोगाची आव्हाने, भारतीय प्रशासकीय सेवेचा प्रवास मिशन सेवा बद्दलची माहिती, तसेच विविध वक्तव्यांकडून प्रेरणादायी मार्गदर्शनाची सत्रे दिवसभर विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहे. सध्या चांदा क्लबवर ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन सुरू आहे, त्याच ठिकाणी एका भव्य शामियानामध्ये हा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. मिशन सेवा अंतर्गत सध्या जिल्ह्यामध्ये दर रविवारी सराव पूर्व परीक्षा घेतली जाते. यासाठी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केल्या जाते. हजारो विद्यार्थी आॅनलाईन रजिस्ट्रेशन करतात.यापूर्वी युथ एम्पावरमेंट समिट घेतले होते. त्यामध्ये ३८ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले. यापैकी पाच हजार विद्यार्थ्यांना ५२ कंपन्यांनी आपापल्या आस्थापनावर नोकरी दिली आहे. आदिवासीबहुल समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या या प्रतिसादाला एक सामूहिक शक्तीचे स्वरूप देण्याचे काम ना. मुनगंटीवार मिशन सेवाच्या माध्यमातून करत आहेत.