चंद्रपूर: दृष्टी या महिलांच्या संघटनेकडून विविध उपक्रम राबविले जाते. दृष्टीच्या महिलांना आणखी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. अंडरग्राऊंड कोल माईन्समध्ये महिलांना जाण्याची सहसा संधी नसते. पण चंद्रपुरातील दृष्टी संस्थेनी डब्ल्यू.सी.एल.च्या मदतीने ही संधी प्रथम महिलांना मिळवून दिली. दृष्टी ही सामाजिक व शैक्षणिक संस्था चंद्रपुरात मागील १० वर्षापासून महिला व मुलींसाठी वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे आणि महिलांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करुन देत आहे. त्यात प्रमाणे यावेळी डब्ल्यूसीएल बल्लारशा येथील ५०० फूट खोल असलेल्या अंडरग्राऊंड कोल माईन्स पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली. वेकोलिचे अधिकारी यांची रितसर परवानगी घेऊन या चंद्रपूरच्या २१ महिलांनी माईन्स पाहण्याचे धाडस दाखविले व वेकोलिच्या सर्व अधिकारी व कामगारांकडून संपूर्ण माहिती गोळा केली. ५०० फूट खोल उतरल्यानंतर दोन ते अडीच किलोमीटर चालून सर्वांनी खाणीतील कारभार कसा चालतो, हे जाणून घेतले.यातून एक अद्भुत अनुभव महिलांनी घेतला. अॅड. वर्षा जामदार, विद्या मसादे, उषा मसादे, मृग्धा कानगे, सारिका बोराडे, वंदना छात्रक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी वृत्तिका धात्रक, अनिता चामचोर, किरण बल्की, नेहा साळवे, सीमा धात्रक, विनीता नामपल्लीवार, माधुरी पोटदुखे, रजनी भुसारी, निर्मला घावडे, शालू जथाडे, सीमा शुक्ला, अनिता जथाडे, पूजा धात्रक, रोहिणी साखरकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
दृष्टीच्या महिलांची भूमिगत कोळसा खाणीला भेट
By admin | Published: May 26, 2016 2:08 AM