शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ताडोबातील आगरझरीचे बटरफ्लाय वर्ल्ड करतेय पर्यटकांना आकर्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:03 PM

ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणूनच पुढे येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.आगरझरी येथे उभारण्यात आलेल्या बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्डच्या लोकार्पणाप्रसंगी शनिवारी ते बोलत होते.

ठळक मुद्दे ताडोबा पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाघ, शेकडो अन्य वन्यजीव, विपूल वनसंपदा, पक्षांच्या शेकडो प्रजाती आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकविणारे मनमोहक फुलपाखरांचे जग ताडोबा व अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपण पर्यावरणाचे देणे लागतो, हे भावना शिकवणार आहे. त्यामुळे ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणूनच पुढे येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातंर्गत आगरझरी येथे उभारण्यात आलेल्या बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्डच्या लोकार्पणाप्रसंगी शनिवारी ते बोलत होते.यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मनपा स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती ब्रिजभुषण पाझारे, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापक उमेश अग्रवाल, मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, डॉ.किशोर मानकर आदी उपस्थित होते. वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा येथील पराक्रमी वाघांच्या उपलब्धतेसोबतच विविध माहितीपूर्ण प्रकल्पांनी बटरफ्लाय वर्ल्ड नव्या स्वरुपात पर्यटकांपुढे लवकरच येणार आहे. येत्या दोन वर्षांत ताडोबा पर्यटनाच्या नकाशावरील पहिल्या पसंतीचे स्थळ राहील, असा दावाही त्यांनी व्यक्त केला. चंद्रपूरमध्ये एखादा उद्योगपती जितका रोजगार निर्माण करु शकत नाही. तितका मोठा रोजगार वाघांमुळे मिळणार आहे. आगरझरी व परिसरात येत्या काळामध्ये वाघ बघायला येणाऱ्या पर्यटकांना पर्यावरणाचे धडे देणारे, पर्यावरणावर प्रेम करायला शिकवणारे आणि पर्यावरणाबद्दल शिक्षित करणारे अनेक प्रकल्प बघायला मिळतील, असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाप्रसंगी पद्मापूर, आगरझरी, अडेगाव, उडीयाटोला, मोहर्ली येथील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय वनअधिकारी शिंदे आणि सहकारी कर्मचाºयांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

रोजगाराला चालनाफुलपाखरु प्रत्येकाच्या लहानातील आकर्षण असते आणि ते कधीच संपत नाही. अगदी १४ दिवसांचे जीवनक्रम असणारे फुलपाखरु जगाला आनंदाने जगण्याचे संदेश देते. या ठिकाणी हजारो फुलपाखरे जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. फुलपाखरु उद्यान व माहिती केंद्र व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र राहणार आहे. यातून पर्यटनाचा विकास होणार असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.असे आहे बटरफ्लाय वर्ल्डलहान मुलांना आवडेल अशा पद्धतीची मांडणी बटरफ्लाय वर्ल्डमध्ये करण्यात आली. फुलपाखरांच्या अनेक प्रजाती बघायला मिळणार आहेत. फुलपाखरांच्या जीवनपटाची शास्त्रीय माहितीही उपलब्ध राहील. काचेच्या घरांमध्ये फुलपाखरांचा मुक्त विहार, लहान मुलांना खेळण्यासाठी विपूल जागा, विविध कारंजी व लटकते पूल, मचान सवारी आदी सुविधा उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प स्थानिक गावकऱ्यांकडून चालविला जाणार आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पtourismपर्यटन