पाठपुरावा : हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश चंद्रपूर: कोल इंडिया लिमिटेडची सबसीडरी वेकोलिद्वारा जमीन संपादन करताना पुनर्वसन व पुनस्थापन धोरणामध्ये आमूलाग्र बदलासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पाठपुराव्यामुळे अपंगासाठी तीन टक्के कोटा आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे विनोद कावरे या दृष्टिहीन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला वेकोलिमध्ये नोकरी देण्यात आली आहे. कोल इंडियाच्या पुनर्वसन व पुनस्थापन धोरण २०१२ व वेकोलिच्या धर्तीवर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरीच्या दृष्टीने सुधारणा करण्यात आली ओह. आधी दिव्यांग प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलित नोकरी मिळत नव्हती. या प्रश्नावर ना. अहीर यांनी सातत्यपूर्ण लढा दिला. वेकोलीने बल्लारपूर क्षेत्रातील पवनी- २ खदानासाठी विनोद कावरे यांची दोन एकर जमीन संपादित केली. परंतु कावरे पूर्णपणे दृष्टीहीन असल्यामुळे नोकरीकरिता अडचणी निर्माण झाल्या होत्या. हे प्रकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अहीर यांनी अतिशय गांभिर्याने घेऊन वेकोलीचे सीएमडी मिश्र यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अपंग कोटा आरक्षित करण्यात आला. नोकरी मिळाल्यानंतर ना अहीर यांच्यासह वेकोलिचे सीएमडी मिश्र, कार्मिक निदेशक संजीवकुमार बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक मिश्रा यांनी प्रकल्पग्रस्त कावरे यांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)
दृष्टिहीन प्रकल्पग्रस्ताला वेकोलिमध्ये नोकरी
By admin | Published: August 03, 2016 1:48 AM