एन.एस. कोकोडे : राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिनब्रह्मपुरी : समाजसेवा हे सर्वात मोठे राष्ट्रभक्ती व देशसेवेचे कार्य आहे. समाजातील दीनदुबळे व पीडित लोकांकरिता रासेयोच्या स्वयंसेवकांनी समस्या समजून घेऊन त्यांच्या जीवनामध्ये नवसंजिवनी प्राप्त करून देण्याचे कार्य करावे. तसेच समाजातील राष्ट्रीय एकात्मता व समानता निर्माण करण्याकरीता साक्षर-निरक्षर यातील दरी कमी करावी. त्याकरिता रासेयोच्या स्वयंसेवकानी रचनात्मक व विधायक कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. एन.एस. कोकोडे यांनी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षीय मार्गदर्शनातून केले.हा कार्यक्रम संस्थेचे सचिव अशोक भैया यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. ए. पारधी यांनी आपल्या अनुभवातून ने. हि. महाविद्यालयातील माजी स्वयंसेवकांचे योगदान कसे होते, याबाबत स्वयंसेवकांना अनेक उदाहरणे व स्वत:चे अनुभव रासेयोच्या स्वयंसेवकांसमोर व्यक्त केले. शांताबाई महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. भास्कर लेनगुरे यांनी रासेयोचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून उदाहरणे सादर केली. रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रकाश वट्टी यांनी पाहुण्याचा परिचय व प्रास्ताविक केले. संचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. मिलिंद पठाडे यांनी केले.आभार शांताबाई भैया महाविद्यालयाच्या रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. सोनाली पारधी यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ. रेखा मेश्राम, डॉ. मोहन कापगते, डॉ. असलम शेख, प्रा. आदे, डॉ. विवेक नागभीडकर, प्रा. आकाश मेश्राम, प्रा. खाजगीवाले, प्रा. वानखडे आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज चन्ने, प्रशांत राऊत, प्रशांत मस्के, वैभव मानगुडे, उत्पल नागदेवते, खानोरकर या स्वयंसेवकांनी व महाविद्यालयातील शेंडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
स्वयंसेवकांनी रचनात्मक कार्यासाठी पुढे यावे
By admin | Published: September 26, 2016 1:13 AM