चंद्रपूर लोकसभा क्षेत्रचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून, काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. एकूण झालेल्या मतदानासह पोस्टल बॅलेटच्या मतांची गणना झाली. यामध्ये सर्वाधिक मते हे काँग्रेसच्या बाजूने पडले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही यावेळी भाजपला नाकारल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे, २०१९च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला १ हजार १५७, तर भाजपला २ हजार १६ मते मिळाली होती.
निवडणुकीच्या कामासाठी तैनात असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार शासकीय अधिकारी, कर्मचारी असलेल्या मतदारांनीदेखील या सुविधेचा लाभ घेत मतदान केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ३ हजार ५१६ टपाली मतदारांनी आपला हक्क बजावला. यातील ५२४ मते बाद झाली आहेत. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना १ हजार ७७५, तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना १ हजार ५१ टपाली मते मिळाली आहे. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांना १ हजार १५७, तर भाजपचे उमेदवार हंसराज अहीर १ हजार १९ मते मिळाली होती. २०१९च्या तुलनेमध्ये यावर्षी टपाली मतदारांनीही काँग्रेसला अधिक पसंती दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.एकूण मतदान -३५३६रद्द झाले मतदान -५२४वैध मतदान -२९९१मिळालेले मतेप्रतिभा धानोरकर-१७७५सुधीर मुनगंटीवार-१०५१पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांत नाराजीमागील अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांकडून नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. यासंदर्भात कर्मचारी संघटनांच्या वतीने निवेदन, आंदोलन, बेमुदत काम बंद आंदोलनसुद्धा केले आहे. मात्र अजूनही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सरकारबाबत नाराजीचा सूर आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातही पोस्टल बॅलेट मतदानातून ही नाराजी दिसून आली.