लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या कोरोनामुळे सर्वत्र दहशत पसरली आहे. असे असतानाच आपला जीव धोक्यात घालून कोरोना योद्धे रुग्णांची सेवा करत आहेत. एवढेच नाही तर महापालिकेचे कर्मचारीही कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये तसेच त्यांचे आरोग्य सुरक्षित रहावे, यासाठी महानगर चंद्रपूर भारतीय जनता पक्ष तसेच श्री विठ्ठल सेवा सहकारी संस्थेच्यावतीने या कोरोना योद्धांना वाफारा मशीन भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती संगीता खांडेकर होत्या. यावेळी मध्य शहर चंद्रपूरचे अध्यक्ष सचिन (बालू) कोतपल्लीवार, राजेंद्र खांडेकर, कार्तिक मुसळे, नकुल आचार्य, निशिकांत महागावकर, पियुष राऊत, आदी उपस्थित होते. शासकीय नियमानुसार सुरक्षित अंतर ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला.