शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

हरवलेल्या बछड्यांच्या शोधात वाघिणीची गावाभोवती भ्रमंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 7:58 AM

गावात दहशत; जागोजागी पायाचे ठसे

ठळक मुद्देरविवारी गोंडमोहळी वासुदेव मसराम यांच्या शेतातील झुडपामध्ये  भरदिवसा वाघिणीने ठाण मांडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव (पिपर्डा) (चंद्रपूर) : ताडोबा बफर झोनअंतर्गत येणाऱ्या पळसगाव व परिसरात  सहा दिवसांपूर्वी एक वाघीण व तिच्या दोन बछड्यांनी धुमाकूळ घातला. गावातील गोऱ्हा ठार करून दोघांना जखमी केले आहे. त्यानंतर  वाघीण व बछड्याला पिटाळून लावण्याच्या प्रयत्नात वाघीण व तिच्या दोन बछड्यांची ताटातूट झाली. वाघिणीचे बछडे तिच्यापासून दूर झाल्यामुळे वाघिणीने हा परिसर अद्याप सोडलेला नाही. सोमवारी सकाळी पळसगावाच्या दिशेने वाघिणीचे पायाचे ठसे आढळून आल्याने गावकऱ्यांत दहशत पसरली आहे. 

रविवारी गोंडमोहळी वासुदेव मसराम यांच्या शेतातील झुडपामध्ये  भरदिवसा वाघिणीने ठाण मांडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.  दरम्यान, काही शेतकरी रविवारी आपली शेतीचे कामे करण्याकरिता गेले असता वाघिणीच्या बछड्याचे दर्शन झाले. सोमवारी पुन्हा पळसगावाच्या दिशेने वाघिणीचे ठसे आढळून आले.  अधूनमधून तिच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकून गावात प्रचंड दहशत आहे. 

वाघिणीपासून धोकाही वाघीण आपल्या बछड्यांपासून दुरावली आहे. सैरभैर झाली आहे. अशा वेळी तिच्याकडून गावकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. सहा दिवस लोटून गेल्यानंतरही वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी या वाघिणीला या परिसरातून हुसकावू शकले नाही, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर