ठळक मुद्देशेतकऱ्यांना मोठा दिलासा : मुनगंटीवार यांनी दिले होते निर्देश
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मूल आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी कालव्याद्वारे सोमवारी सोडण्यात आले.सावली तालुक्यातील वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी सातत्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. सन २००६ मध्ये कार्यान्वित झालेल्या सदर उपसा सिंचन योजनेचे पाणी नियमित शेतकऱ्यांना देण्यात येत होते. गेल्या खरीप हंगामापासून योजनेचे पाणी बंद होते.या खरीप हंगामासाठी सदर उपसा सिंचन योजनेचे पाणी लवकरात लवकर सोडण्याची मागणी या ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून केली होती. ना. मुनगंटीवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सदर योजनेचे पाणी सोडण्याचे निर्देश दिले.त्यानुसार सदर योजनेचे पाणी आज कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. सदर मागणीच्या पुर्ततेमुळे मुल आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी मूल नगर परिषद उपाध्यक्ष नंदू रणदिवे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आत्राम, सरपंच तंगडपल्लीवार, पंचायत समिती सदस्य रवी गोलीवार, नितीन कारडे आदींसह सदर परिसरातील शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:14 PM