शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

वहिदा रहेमान यांनी लुटला ताडोबा जंगल सफारीचा आनंद..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 4:20 PM

नागपुरात गेल्या आठवड्यात लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान व गायक रुपकुमार राठोड यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून व्याघ्रदर्शनासह जंगल सफारीचा आनंद लुटला.

ठळक मुद्देताडोबातील माया वाघीण आणि मायानगरीतील वहिदा यांची प्रदीर्घ भेटउन्हाची पर्वा न करता तीन दिवस जंगलभ्रमणरुपकुमार राठोड यांनीही केले ताडोबाचे कौतुक

राजेश भोजेकर/ राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: नागपुरात गेल्या आठवड्यात लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान व गायक रुपकुमार राठोड यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून व्याघ्रदर्शनासह जंगल सफारीचा आनंद लुटला.विशेष म्हणजे, त्यांना या सफारीच्या पहिल्याच दिवशी माया वाघिणीने बराच वेळ दर्शन दिले.वहिदा रहेमान आणि रुपकुमार राठोड हे शनिवारी ताडोबात दाखल झाले होते. त्याच दिवशी त्यांना माया वाघिणीने निवांत दर्शन दिले. इतक्या दीर्घकाळ वाघ बघण्याचा हा अनुभव अतिशय आनंददायक असल्याचे मनोगत वहिदा रहेमान यांनी व्यक्त केले. तिला आपण डोळ्यात साठवून ठेवल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.विदर्भाच्या उन्हाळ्यात तीन दिवस जंगलभ्रमण करणे हे तसे सोपे काम नाही. पण निसर्ग व प्राणी प्रेमी असलेल्या वहिदाजींनी त्यावर मात करीत, एखाद्या निष्णात जंगलप्रेमीसारख्या ताडोबातील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. सोमवारी दुपारी ताडोबाचा निरोप घेताना त्यांनी ताडोबाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी असलेल्या बांबू रिसॉर्टमध्ये त्यांचा मुक्काम होता. ताडोबा हे भारतातील एक महत्त्वाचे अभयारण्य असल्याची पावती गायक रुपकुमार राठोड यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प