शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नागरिकांना मतदार यादीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2017 12:25 AM

महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. आता मार्च महिन्याला सुरुवातही झाली आहे.

वेध मनपा निवडणुकीचे : मनपा प्रशासनाची कासवगतीने वाटचालचंद्रपूर : महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. आता मार्च महिन्याला सुरुवातही झाली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते. असे असतानाही मनपा प्रशासनाची निवडणूकपूर्व प्रक्रिया मात्र अतिशय संथ गतीने सुरू आहे. आतापर्यंत अंतिम प्रभाग रचना पूर्ण झाली नसून नागरिकांसमोर मतदार यादीही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. नागरिकांना अद्याप मतदार यादीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.मागील महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वादळ जिल्हाभर जोरात वाहत होते. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी २३ फेब्रुवारीच्या निकालानंतर थांबलीे. भाजपाने जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३३ तर पंचायत समितीच्या ११२ जागांपैकी ७१ एवढ्या जागांवर वर्चस्व सिध्द केले. मिनी मंत्रालयात भाजपाची सत्ता बसेल, हे निर्विवाद आहे. या निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांना चांगलाच हादरा बसला. आता चंद्रपूर महानगरपालिकेचीही निवडणूक तोंडावर आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या चुकांची मनपा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नव्याने व्युहरचना करण्यात व्यस्त झाले आहेत. प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर पदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात फिरणे सुरू केले आहे. भल्या सकाळीच हे नगरसेवक आता वॉर्डात नागरिकांशी संवाद साधताना दिसून येत आहे. एकूणच चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल, असा अंदाज आहे. एकूणच मनपा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. असे असतानाही या निवडणुकीपूर्वीची प्रक्रिया म्हणजे प्रभाग रचना करणे, त्यावर आक्षेप मागविणे, आक्षेपानंतर पुन्हा अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे, मतदार यादी अद्यावत करणे, ती नागरिकांसमोर उपलब्ध करणे, त्यावर आक्षेप आल्यास पुन्हा नव्याने मतदार यादी अद्यावत करून प्रसिध्द करणे यासारखी कामे करण्यास मनपा प्रशासनाकडून विलंब होत आहे. ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. २०११ च्या मतदार यादीत अनेक बदल झाले आहेत. अनेक नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली की नाही, हे बघण्याची उत्सुकता आहे. यादीत नावे नसतील वा वेगळ्याच प्रभागात नावे असतील तर त्यावर आक्षेप नोंदवावे लागतात. यात आणखी काही दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ही मतदार यादी २७ फेब्रुवारीपर्यंतच नागरिकांसमोर ठेवण्यात येईल, असे संकेत मनपा प्रशासनाने दिले होते. मात्र आज १ मार्च रोजीही ही यादी नागरिकांसमोर प्रसिध्द करण्यात आलेली नाही. या संथगतीच्या कामामुळे पुढे अत्यंत ढिसाडघाईने कामे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (नगर प्रतिनिधी)तीन प्रभाग रचनेत बदलचंद्रपूर महानगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३३ प्रभाग पाडण्यात आले होते. या ३३ प्रभागातून ६६ नगरसेवक निवडून द्यायचे होते. याप्रमाणे मतदारांनी एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले. मात्र यावेळी यात बदल झाला आहे. २२ डिसेंबर २०१६ रोजी चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी शासनाने पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल केला आहे. सध्या अस्तित्वात असलेले ३३ प्रभाग मोडीत काढून नव्याने १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात १७ प्रभागापैकी १५ प्रभागात प्रत्येकी चार नगरसेवक तर उर्वरित दोन प्रभागात तीन नगरसेवक, असे एकूण ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. प्रभाग रचना व प्रभागातील आरक्षण डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आले. त्यानंतर यावर आक्षेप नोंदविण्यात आले होते. नगरसेवक संजय वैद्य, संदीप आवारी, नंदू नागरकर आदींनी प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदविल्यानंतर हे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले. त्यामुळे सिव्हील लाईन, भिवापूर, शास्त्रीनगर या प्रभाग रचनेत बदल करण्यात आलेला आहे. मात्र हा बदल करून अंतिम प्रभाग रचनाही अद्याप प्रसिध्द करण्यात आलेली नाही.