लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राकरिता जमिनीचे संपादन केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या तब्बल दोन पिढ्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मोबदल्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष वर्षानुवर्षापासून सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हस्तक्षेप करीत प्रकल्पग्रस्तांवरील घोर अन्याय दूर करून त्यांच्या नोकरी व मोबदल्याचा प्रश्न त्वरित निकाली काढा, असे निर्देश दिले.या संदर्भात ना. हंसराज अहीर यांनी आज गुरुवारी वीज केंद्र व इतर विभागातील अधिकाºयांची तातडीची आढावा बैठक बोलाविली. या बैठकीस चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे, उपमहापौर अनिल फुलझेले, सीटीपीएसचे अधिकारी परचाके, प्रभावत, जि.प. च्या कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जीवतोडे व अनेक गावातील सीटीपीएस प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.जमिनीचे संपादन करण्यात आले अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरीत सामावून घेत न्याय देण्याची जबाबदारी असताना त्यांना आतापर्यंत नोकरीपासून वंचित ठेवण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशा प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र बदलवून त्यांच्या कायदेशिर वारसानांच्या नावे हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र परिवर्तन करून त्या प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा प्रश्न मानवीय दृष्टीकोनातून सोडविण्याची आवश्यकता असल्याचेही ना. अहीर यांनी उपस्थित अधिकाºयांना संबोधित करताना सांगितले. किमान प्रकल्पग्रस्तांबाबत शासन धोरणात बदल अपेक्षित असल्याने त्या दृष्टीकोनातून अधिकाºयांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची सूचना देवून नोकरी व मोबदलाविषयक प्रलंबित प्रकरणाची सविस्तर माहिती स्थानिक पातळीवर घेऊन नोकरीविषयक प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्याच्या सूचना केल्या.महाऔष्णिक केंद्रातील शिकाऊ उमेदवारांना शासन परिपत्रकानुसार मानधन वृद्धी मिळत नसल्याच्या तक्रारीबाबत ना. अहीर यांनी अधिकाºयांची कानउघाडणी करीत येत्या १५ ते २० दिवसामध्ये संंबधित शिकाऊ उमेदवारांना मानधन वृद्धीची देय असलेली राशी त्वरित देण्याचे निर्देश दिले.सामाजिक दायित्वनिधी (सीएसआर)च्या विकास कामांचा आढावा यावेळी अधिकाºयांनी ना. अहीर यांना सादर केला. सदर सामाजिक दायित्व निधी चंद्रपूर महानगरातील विकास कामांकरिता प्राधान्यक्रम देऊन वापरला जावा, अशाही सूचना त्यांनी केल्या.कामगारांना दिलासाचंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राशी निगडीत कुशल व अकुशल कामगारांना मानधनावर सामावून घेण्याच्या सूचना ना. अहीर यांनी दिल्या होत्या. मंत्र्यांच्या सूचनेनुसार २३१ कुशल व अकुशल कामगारांना २५ सप्टेंबरपासून मानधनावर सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. या कामगारांना शैक्षणिक योग्यतेनुसार प्रतिमाह ६ ते १० हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचेही सीटीपीएस व्यवस्थापनाद्वारे सांगण्यात आले.
प्रकल्पग्रस्त दोन पिढ्यांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:22 AM
चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राकरिता जमिनीचे संपादन केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या तब्बल दोन पिढ्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
ठळक मुद्देतत्काळ नोकºया द्या : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी घेतला आढावा