शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पणन महासंघाच्या कापूस खरेदीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 6:00 AM

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत कापूस व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावा लागत आहे. कापसाला ५ हजार ५५० रूपये हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कपाशीची बोंडे झाडावरच सडली. यावर्षी लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत.

ठळक मुद्देव्यापारी मालामाल : केंद्रांअभावी शेतकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पणन महासंघाने अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. परिणामी, खासगी व्यापारी कवडीमोल भावात कापसाची लूट करत आहे. त्यामुळे शासनाने सरकारी कापूस केंद्र्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. पण, जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ नाही. शासनाने अद्याप सरकारी कापूस संकलन केंद्र्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस व्यापाऱ्यांना अल्प भावात विकावा लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. राजुरा, कोरपना, वरोरा, माढेळी येथे पणन महासंघाची कापूस खरेदी केली जायची. परंतु पणनने अद्याप कापूस खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत कापूस व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावा लागत आहे. कापसाला ५ हजार ५५० रूपये हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कपाशीची बोंडे झाडावरच सडली. यावर्षी लागवडीचा खर्च निघेल की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कर्ज काढणारे शेतकरी तर हतबल झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.धान उत्पादकांची चिंता वाढलीसिंदेवाही : धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता दिसत असल्याने धान उत्पादकांची चिंता वाढली तर दुसरीकडे रब्बी हंगामाकरिता शेतात काय पेरावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाच्या वतीने हरभरा व गहू अनुदानावर उपलब्ध करून दिल्या जात आहे. अत्यल्प पाण्यात पिकणारे वाण हरभºयाला चांगली मागणी आहे. मात्र, सरकारच्या धोरणामुळे गतवर्षी हरभरा व गव्हाला अल्प भाव जाहीर मिळाला. नफातोट्याचा विचार करता शेतकºयांची गुजरान होईल, एवढे उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी रब्बी हंगामात कोणती पिके घ्यावी, याविषयी चिंताग्रस्त झाले आहेत. भाजीपाल्यातही फुलकोबी व पानकोबीला पाहिजे तेवढा भाव नसल्याने शेतकरी हे पीक घेवू शकत नाही. टमाटरला वर्षभर भाव मिळाला नाही. वांग्याला व मिरचीला बºयांपैकी भाव मिळाला. नवे तंत्र शेतकºयाच्या शेतात पोहचल्यास निश्चितच शेतकरी रब्बी पिके घेऊ शकतात. मात्र, अवकाळी पावसाने यंदा शेतकºयांचे नियोजन कोलमडल्याचे तालुक्यात दिसून येत आहे.

टॅग्स :cottonकापूस