लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : सिंदेवाही रेल्वे स्टेशन हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रॉडगेज रेल्वे लाईनवरील मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. मात्र या रेल्वे स्टेशनवर विविध समस्या आहेत. यातील मुख्य समस्या म्हणजे उड्डाण पुलाची आहे. उड्डाण पूल नसल्यामुळे दिवसातून अनेकदा रेल्वे फाटक बंद असते. परिणामी नागरिकांना दररोज तासन्तास फाटक उघडण्याची वाट बघत ताटकळत राहावे लागते. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर उड्डाणपूल बनविण्याची मागणी नागरिकांकडून व रेल्वे प्रवाशाकडून करण्यात येत आहे.सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, क्रीडा स्टेडीयम, शासकीय वसतिगृह, विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक व सहकारी संस्था आहेत. तसेच पाथरी व गुंजेवाही परिसरातील नागरिकांना सिंदेवाहीला येताना रेल्वे लाईन ओलांडून यावे लागते. परंतु रेल्वे फाटक नेहमी बंद राहत असल्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना रेल्वे फाटक उघडेपर्यंत ट्रक, एस.टी. बस, ट्रॅक्टर, टू व्हीलर, फोर व्हीलर चालकांना ताटकळत राहावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असतो. तसेच सिंदेवाही रेल्वे स्थानकावर विविध समस्या असल्यामुळे प्रवाशांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सिंदेवाही रेल्वे स्टेशन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या अंतर्गत येते. गोंदिया ते बल्लारपूर या ब्रॉडगेज रेल्वे लाईनवर सिंदेवाही रेल्वे स्थानक आहे. या मार्गावर चार पॅसेंजर गाड्या गोंदिया ते बल्लारपूर व चार पॅसेंजर बल्लारपूर ते गोंदियाला दररोज ये-जा करतात. त्यामुळे येथे प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. तसेच दरभंगा ते हैद्राबाद, हैद्राबाद ते कोरबा, बिलासपूर ते चेन्नई, यशवंतपूर ते दुर्ग या सुपरफास्ट रेल्वे गाड्या आठवड्यातून दोन वेळा धावतात.मात्र या गाड्याचा थांबा सिंदेवाहीला नाही. तसेच सिंदेवाही रेल्वे स्थानकावर एकही सुपरफास्ट रेल्वे थांबत नाही. सिंदेवाही रेल्वे स्थानकावर रोज गाड्याचे क्रॉसींग होत असल्यामुळे प्रवाशांना रेल्वे लाईन ओलांडून जीव धोक्यात घालून रेल्वे लाईन क्रॉस करावे लागत आहे.
सिंदेवाहीवासीयांना उड्डाणपुलाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:27 AM
सिंदेवाही रेल्वे स्टेशन हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रॉडगेज रेल्वे लाईनवरील मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. मात्र या रेल्वे स्टेशनवर विविध समस्या आहेत. यातील मुख्य समस्या म्हणजे उड्डाण पुलाची आहे. उड्डाण पूल नसल्यामुळे दिवसातून अनेकदा रेल्वे फाटक बंद असते.
ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय : दिवसातून अनेकदा रेल्वेफाटक बंद