राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एकात्मिक फलोत्पादन अभियानातील १९ कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी यंदा जिल्ह्यातील ४ हजार ४५६ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. अशी नोंदणी करणाºया शेतकºयांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच वाढली आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागला. त्यामुळे कृषी विभाग या योजनेची सोडत केव्हा काढणार, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहेत.एकात्मिक फलोत्पादन अभियानअंतर्गत १९ कृषी प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. अनुदानित विविध योजनांच्या लाभासाठी आॅनलाईन अर्ज भरावे लागते. सामूहिक शेततळे, हरितगृह, शेडनेट हाऊस, हरितगृहातील उच्च दर्जाचे लागवड साहित्य, फलोत्पादन यांत्रिकीकरण व पुष्पोत्पादन आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे. यातील बहुतांश योजनांना १०० टक्के अनुदान आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन पद्धतीने हॉर्टनेट या संगणक प्रणालीवर अर्ज भरणे कृषी विभागाने बंधनकारक केले आहे. ग्रामीण व आदिवासी भागात इंटरनेटची सुविधा नसताना ही आॅनलाईन पद्धत अन्यायकारक असल्याची टीका कृषी विभागावर झाली होती.परंतु, विविध योजनांद्वारे पारंपरिक शेती बदलेल आणि आधुनिक शेतीतून आर्थिक लाभ होईल, या आशेवर असणाºया ४ हजार ४५६ शेतकºयांनी विविध संकटे पार करून आॅनलाईन नोंदणी केली. अद्याप सोडत न निघाल्याने शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे.अन्यथा योजना कागदावरचफलोत्पादन अभियान शेतकºयांना बळ देणारी आहे. अंमलबजावणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची भूमिका परिणामकारक असली पाहिजे. अन्यथा आॅनलाईन अर्जाची पाचर मारलेल्या अनेक योजना कागदावरच राहतात, असा शेतकºयांचा आरोप आहे. या अभियान समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी आहेत. जिल्ह्याला मिळालेल्या लक्ष्यांकानुसार लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करताना पात्र शेतकºयांवर अन्याय होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे.शेततळ्यांसाठी सर्वाधिक अर्जसामूहिक शेततळे, हरितगृह, शेडनेट हाऊस, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला, फुलपिके लागवड साहित्य व निविष्ठा अनुदान मिळावे, याकरिता शेतकºयांनी अर्ज केला. मात्र, यामध्ये सामूहिक शेततळ्यांसाठी अर्ज करणाºयांची संख्या सर्वाधिक आहे.निधी खर्चात जिल्हा माघारलाएकात्मिक फलोत्पादन अभियानअंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात प्राप्त रकमेतून ६४.५८ टक्के रक्कम खर्च झाले होते. २०१८-१९ चा वार्षिक कृती आराखडा १०१.५३ लाखांचा आहे. यातील १०० टक्के निधी कसा खर्च होईल, याचे नियोजन कृषी विभागाने केले पाहिजे.
साडेचार हजार शेतकऱ्यांना ‘फलोत्पादन’ सोडतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:29 AM
एकात्मिक फलोत्पादन अभियानातील १९ कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी यंदा जिल्ह्यातील ४ हजार ४५६ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. अशी नोंदणी करणाºया शेतकºयांची संख्या मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच वाढली आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागला.
ठळक मुद्देयंदा सर्वाधिक आॅनलाईन नोंदणी : १९ कृषी योजनांच्या लाभासाठी वाढली स्पर्धा