आश्रमशाळेतील शिक्षकांची व्यथा : पाच महिन्यांचे वेतन थकीतलोकमत न्यूज नेटवर्कतोहोगाव : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांना मान्यता दिली. येथील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक नेहमीच प्रयत्नरत असतात. मात्र आश्रमशाळेतील शिक्षकाचे मागील पाच महिन्यांपासूनचे वेतन प्रलंबित आहे. परिणामी शिक्षकांना आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे प्रलंबित वेतन देण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामीण भागात आश्रमशाळेची स्थापना करण्यात आली. या आश्रमशाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने आश्रमशाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांना भेटून शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगतात. त्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त करतात. तसेच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच प्रयत्नरत असतात. मात्र आश्रमशाळेतील शिक्षकांचे वेतन हे कधीच नियमीत देण्यात येत नाही. मागील पाच महिन्यांपासून आश्रमशाळेतील शिक्षकांचे वेतन प्रलंबित आहे. परिणामी शिक्षकांंना आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे थकित वेतन त्वरीत देण्याची मागणी करण्यात येत आहे.कर्जाचे हप्ते भरण्यासाठी अडचणअनेक शिक्षकांनी विविध बँक व पतसंस्थेतून गृहगर्ज तसेच विविध कर्जाची उचल केली आहे. ते पगार झाल्यानंतर कर्जाचे हप्ते भरत असतात. मात्र मागील पाच महिन्यांपासून पगार होत नसल्यामुळे कर्ज भरण्यास अडचण जात आहे. त्यामुळे बँकेचे कर्मचारी पैसे भरण्यासाठी तगादा लावत आहे. तसेच नुकतीच शाळा सुरु झाली आहे. त्यामुळे शिक्षकांना आपल्या पाल्यांसाठी शालेय गणवेश, पुस्तके नोटबुक घ्यावयाची आहेत. मात्र वेतन थकित असल्यामुळे शिक्षक आपल्या पाल्यांसाठी वस्तूंची खरेदी करु शकत नाही. त्यामुळे थकित वेतन त्वरीत देण्याची मागणी आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी वर्गाकडून करण्यात येत आहे.
शिक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: June 28, 2017 12:54 AM