लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्राच्या अंतर्गत पौनी-२ खुल्या खाणीकरिता ७६० एकर जमिनीचे अधिग्रहण झाले. गात्र अनेकांना नोकऱ्या मिळाल्या नाही. त्यामुळे वेकोलि विरोधात संतप्त प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुरू केले. याबाबत ना. हंसराज अहीर यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. अखेर वेकोलि मुख्यालयाने सकारात्मक अहवाल कोळसा मंत्रालयाला पाठविला. त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.पौनी-२ खुल्या खाणीकरिता ७६० एकर जमिनीचे अधिग्रहण झाले. त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने आठ लाख, १० लाख रूपये प्रति एकर भाव व दोनशेच्यावर नोकऱ्या, महिला, अंध, अपंगांनासुध्दा नोकºया मिळाल्या. परंतु या दरम्यान या प्रकल्पामध्ये सीबी अॅक्ट १९५७ सेक्शन ९ च्या अधिसूचनेच्या दिल्ली येथील प्रकाशनाची अधिसूचना जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना देण्यात न आल्याने व दुय्यम निबंधक, राजुरा यांना उशिरा देण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांच्या खरेदी-विक्री चालू राहिल्या. परंतु या सर्व नवीन जमीन मालकांना नोकऱ्या देण्यास वेकोलिने नकार दिला होता.प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हा विषय खुशाल बोंडे, राहुल सराफ, राजू घरोटे, अॅड. प्रशांत घरोटे यांच्यापर्यंत पोचविल्यानंतर ना. अहीर यांच्या मार्गदर्शनात हा विषयावरील शेतकऱ्यांना नोकरी मिळण्याबाबत वेगवेगळया पातळयांवर प्रयत्न करण्यात आले व जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी याबाबत या २२ शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेण्याबाबत १९ आॅक्टोंबर २०१६ व ३ आॅक्टोबर २०१८ रोजी आदेश पारित केला आणि वेकोलि मुख्यालयाने हा आदेश कोळसा मंत्रालयाकडे पुढील निदेर्शाकरिता पाठविला. परंतु ही सगळी प्रक्रिया ना. अहीर यांच्या प्रयत्नाने सुरळीत चालू असताना अंतिम टप्प्यात मंत्रालयातून मुख्यालयाला अहवाल मागितला असता मुख्यालयाने पुर्णत: चुकीचा व नकारात्मक अहवाल पाठविला. यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी वेकोलिच्या विरोधात २६ नोव्हेंबर २०१८ पासून ााजपा जिल्हा किसान आघाडीचे महामंत्री राजू घरोटे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणाची सुरूवात केली. आंदोलनादरम्यान वेकोलि प्रबंधन व उपोषणकर्ते यांच्यामध्ये चर्चा होवून मागणीनुसार मुख्यालयाने पाठविलेला चुकीचा अहवालाऐवजी नवीन सकारात्मक अहवाल प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मुद्यासह २९ नोव्हेबरला कोळसा मंत्रालयाला पाठविला व याची प्रत उपोषणकर्त्र्यांना देण्यात आली व याबाबत मंत्रालयातून त्वरित निर्णय येण्याबाबत वेकोलिसोबत पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासनसुध्दा देण्यात आले. यावेळी वेकोलि मुख्यालय महाप्रबंधक बी.सी. सिंह, उपक्षेत्रिय प्रबंधक सी.पी. सिंग, राजुराचे ठाणेदार कोकाटे, खुशाल बोंडे, वाघुजी गेडाम, राहुल सराफ, सतीश दांडगे, अॅड. प्रशांत घरोटे, सचिन डोहे, उपोषणकर्ते किरण सिंगाराव, प्रताप सिंगाराव, सिनू दुडम, विक्रम बोंतला, सागर काटवले आदी उपस्थित होते.
वेकोलिचा अहवाल कोळसा मंत्रालयाला सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:24 PM
बल्लारपूर वेकोलि क्षेत्राच्या अंतर्गत पौनी-२ खुल्या खाणीकरिता ७६० एकर जमिनीचे अधिग्रहण झाले. गात्र अनेकांना नोकऱ्या मिळाल्या नाही. त्यामुळे वेकोलि विरोधात संतप्त प्रकल्पग्रस्तांनी साखळी उपोषण सुरू केले. याबाबत ना. हंसराज अहीर यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. अखेर वेकोलि मुख्यालयाने सकारात्मक अहवाल कोळसा मंत्रालयाला पाठविला. त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे : नोकरी देण्याचे आश्वासन