शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

शक्तीशाली ब्लॉस्टींगने घराची भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 11:54 PM

वेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लॉस्टींगने गोवरी येथील शंकर काळे (४५) यांच्या घराची भिंत सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोसळली.

ठळक मुद्देगोवरी येथील घटना : कुटुंब बचावले, वेकोलित नियमांची एैशीतैसी

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : वेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लॉस्टींगने गोवरी येथील शंकर काळे (४५) यांच्या घराची भिंत सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोसळली. यात सुदैवाने अख्खे कुटुंबच बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. वेकोलित होणाºया शक्तीशाली ब्लॉस्टींगमुळे गावकºयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या गोवरी, पोवनी, सास्ती, साखरी परिसरात मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. वेकोलिची गोवरी व पोवनी कोळसा खाण गावाला अगदी लागून आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलित शक्तीशाली स्फोट घडविले जातात. भूकंप झाल्यागत जमिनीला धक्के बसतात. त्यामुळे बहुतांश घरांना अल्पावधीतच तडे गेले आहे. गोवरी येथील शंकर काळे यांच्या घराची भिंत कोसळली.मात्र सुदैवाने भिंत मागील बाजुस पडली. त्यावेळी शंकर काळे यांचा मुलगा, मुलगी, पत्नी घरीच होते. मात्र नशिब बलवत्तर म्हणून ते या दुर्घटनेतून बचावले.त्यामुळे वेकोलित कोळसा उत्खननासाठी घडवून आणत असलेले शक्तीशाली ब्लॉस्टींग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. वेकोलित नियम धाब्यावर बसवून शक्तीशाली स्फोट घडवून आणले जातात. नियमांची एैशीतैशी करणाºयांवर कडक कारवाई का केली जात नाही, हा चिंतनाचा विषय आहे. वेकोलिचे जबाबदारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ब्लॉस्टींगने अशा दुर्घटना घडतात.अनेक घरांना भेगाब्लॉस्टींगने गोवरी येथील अनेक घरांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. अल्पावधीतच घरांना तडे जात असल्याने ब्लॉस्टींगने घरे कमकुवत होत चालली आहे. वेकोलित ब्लॉस्टींग करताना काही नियम आखून दिले आहेत. परंतु या नियमांची वेकोलिच्या जबाबदार अधिकाºयांकडूनच पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे दिवसागणिक दुर्घटनेत मोठी वाढ झाली आहे. ब्लॉस्टींगने शंकर काळे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.मोठा अनर्थ टळलागोवरी येथील शंकर काळे यांच्या घराची भिंत कोसळली, तेव्हा घराशेजारील चिमुकली मुलेही तिथे खेळत होती. मात्र घटनेच्या पाच मिनिटापूर्वीच खेळणारी चिमुकली मुले तिथून निघून गेली आणि काही वेळातच काही न कळायच्या आत घराची संपूर्ण भिंतच कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.