शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

चंद्रपूर भागात बछड्यांसह फिरणाऱ्या वाघिणीचे पुन्हा दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 2:48 PM

नागभीड तालुक्यातील गिरगाव परिसरात ७ मार्चपासून वाघिणीने आपल्या तीन बछड्यासह मुक्काम ठोकला आहे. गावकऱ्यांनी वनविभागावर दबाव टाकल्यानंतर येथील वनाधिकाऱ्यांनी वाघिणीला बेशुध्द करण्याची वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे.

ठळक मुद्देबेशुद्ध करण्याची मागितली परवानगीगावकऱ्यांमध्ये घबराट

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील गिरगाव परिसरात ७ मार्चपासून वाघिणीने आपल्या तीन बछड्यासह मुक्काम ठोकला आहे. गावकऱ्यांना सतत वाघिणीचे दर्शन होत आहे. शुक्रवारी पुन्हा शेतकऱ्याला वाघिणीचे बछड्यासह दर्शन झाले. जनावरांसह शेतकऱ्यांवरही वाघीण हल्ला करीत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी वनविभागावर दबाव टाकल्यानंतर येथील वनाधिकाऱ्यांनी वाघिणीला बेशुध्द करण्याची वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे.गिरगाव येथील मोठा नाला परिसर, भिवा नगर परिसर, लेंडारी शेतशिवार याठिकाणी सतत वाघीण बछड्यासह गावकऱ्यांना दिसत आहे. बुधवारी सावरगाव - कन्हाळगाव रोडलगत बैलाला ठार केले. गुरुवारी गिरगाव येथील मंगरू पर्वते यांच्या शेतात गोऱ्हाला वाघिणीने ठार केले. दैव बलवत्तर म्हणून मंगरु पर्वते बचावले. त्यानंतर गिरगाव येथील शेतकरी गोपाला थेरकर व त्यांचे सहकारी सुरेश शेंडे यांच्यावर शेतात कामे करीत असताना वाघिणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आरडाओरड केल्यानंतर वाघीण पळून गेली. या वाघिणीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे सिंदेवाही तालुक्यातील किन्ही, मुरमाडी या परिसरात दोन व्यक्तींना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावे लागला आहे. याच घटनेची पुनरावृत्ती गिरगावात घडू नये, यासाठी गिरगाव ग्रामस्थांनी तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांना वाघिणीच्या बंदोबस्ताबाबत निवेदन दिले. परिसरातील शेतकरी धानाचे दुबार पीक घेतात तर काही शेतकरी भाजीपाल्यांची लागवड करतात. विशेष म्हणजे, याच मार्गाने शालेय विद्यार्थी सायकलने ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत व शेतकऱ्यांना शेतात जावे कसे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वनविभागाचे कर्मचारी रात्रंदिवस परिसरात गस्त घालत आहेत. फटाके फोडून वाघिणीला पळविण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र वाघीण पळाली नाही. दरम्यान, वाघाच्या बंदोबस्ताबाबत शुक्रवारी गिरगाव येथील वनविभागाच्या नाक्यावर ग्रामस्थ व वनाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर वाघिणीसाठी गठीत केलेल्या चौकशी समितीचीही बैठक झाली. गावकऱ्यांचा दबाव वाढत असल्याने वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के व चौकशी समितीने वाघिणीला बेशुध्द करण्याची व तिला बछड्यासह चपराळा किंवा इतर जंगलात सोडण्याची परवानगी मागितली आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प