शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

वर्धा पॉवरचे काम सुरळीत

By admin | Published: April 05, 2015 1:37 AM

वर्धा पॉवर प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने वर्धा पॉवर कंपनी बंद करीत असल्याची घोषणा विधान परिषदेमध्ये राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी केली.

वरोरा : वर्धा पॉवर प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने वर्धा पॉवर कंपनी बंद करीत असल्याची घोषणा विधान परिषदेमध्ये राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी केली. याबाबत वृत्त प्रकाशित होताच, कामगारांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. परंतु, वर्धा पॉवर कंपनीला पर्यावरण खात्याची नोटीस मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी परिसरात फेरफटका मारला असता, शनिवारी कंपनीचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले.वरोरा शहरालगच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वर्धा पॉवर हा खासगी वीज निर्मिती प्रकल्प सन २०११ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पामध्ये १३५ मेगावॅटचे चार युनीट असून त्यामध्ये ५४० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत होती. वीज देण्यासंबंधीचे काही करार मागील काही वर्षात संपुष्टात आल्याने मागील दोन वर्षांपासून १३५ मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येत आहे. उर्वरित तीन युनिट बंद आहेत. या प्रकल्पाला मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एकही नोटीस मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यातच मागील वर्षापर्यंतची बँक गॅरंटी प्रकल्पाला मिळाली असल्याचे समजते. या सत्रात बँक गॅरंटीची परवानगी मिळाली असून ती मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती आहे. वर्धा पॉवर कंपनीचे १३५ मेगावॅटचे एकच युनिट सुरू आहे व दोन वर्षात कंपनीला पर्यावरण विभागाची नोटीसही मिळाले नसल्याने कंपनीला टाळे ठोकण्याची घोषणा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)