लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्टÑ राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रात बुधवारी योगेश मार्कंडे लिखित व संतोष चोपडे दिग्दर्शित ‘विल यु मॅरी मी ’ हे नाटक सादर झाले. सहयोगी कलावंत सां. शै. सां. संस्था, वर्धा यांनी नाटकाचे उत्तम सादरीकरण करुन प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.मोहन माने हा आपल्या तिसºया पत्नीला घटस्फोट देणार, त्या दिवसापासून नाटकाची सुरुवात होते. मोहनच्या पहिल्या दिवंगत पत्नीपासून प्रकाश नावाचा मुलगा आहे. प्रकाशची स्वत:ची एक कंपनी आहे. पण, ती डबघाईस आली आहे. मोहनची दुसरी पत्नी म्हणजे त्याची मेहुणी कामिनी आणि आता मोहन पुन्हा चवथ्या लग्नाला तयार आहे. ‘हॅपी गो लकी’ या स्वभावाच्या मुलीशी तो लग्न करणार आहे आणि त्याचा मुलगा प्रकाश हा देखील छाया नावाच्या मुलीच्या प्रेमात आहे, हे समजते. कामिनीने आता सरपटे नावाच्या माणसाशी लग्न केले आहे. त्याला तिने अगदी नंदीबैल बनवले. मोहनची तिसरी पत्नी मोहिनी अभय या पतपेढीच्या मालकाशी लग्न करणार असते, असा हा प्रकार आहे.प्रत्येक जोडप्यांचे लग्न ठरले म्हणून मोहन एकत्रित एक कॉकटेल पार्टी देतो. त्या पार्टीमध्ये एक गेम असते की प्रत्येकाने आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल खोटं बोलायचं असतं. पण ते खोटं नसून खरंच बोलत असतात. त्यावरुन प्रत्येकाची व्यक्तीरेखा काय आहे, हे समजणे सोपे जाते आणि अचानक पार्टीमध्ये एक वकील हजर होतो. एका इसमाने मृत्यूपत्रात तीस कोटींची प्रापर्टी प्रकाशला दिल्याचे सांगतो. त्या इसमाचे प्रकाशच्या आईशी संबंध होते आणि प्रकाश त्यांचा मुलगा असतो. तीस कोटी रुपये प्रकाश आणि त्याच्या पालकांना मिळणार त्यामुळे प्रकाशचे पालकत्व मिळावे म्हणून प्रत्येकाची धडपड सुरु होते.पण सरपटे यांनी संपती स्वीकारायला दिलेल्या नकारामुळे सर्वांना पैशाबद्दल उपरती होते. सर्वजण तो पैसा नाकारतात व नाते संबंधाचे मोल कळायला लागते. नाटकाचे सुंदर नेपथ्य, प्रकाश योजना उत्तम होती. या नाटकात अभिनयाची कमतरता जाणवते. मात्र नाटक सामाजिक संदेश देणारे होते.
सामाजिक संदेश देणारे ‘विल यु मॅरी मी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:00 AM
महाराष्टÑ राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रात बुधवारी योगेश मार्कंडे लिखित व संतोष चोपडे दिग्दर्शित ‘विल यु मॅरी मी ’ हे नाटक सादर झाले.
ठळक मुद्देयोगेश मार्कंडे लिखित व संतोष चोपडे दिग्दर्शित ‘विल यु मॅरी मी ’ हे नाटक सादर झाले.