लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : मागील चार दिवसांपासून शहरातील नळधारकांना अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. दोन दिवस वीज खांब तुटून पडून असल्याने जीवन प्राधिकरणाला विद्युत पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे पाणी पुरवठा होऊ शकली नाही तर वस्ती विभागाकडे जाणाºया गोलपुलीया जवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईप लाईन काँक्रीट रोडच्या कामात फुटल्याने वस्ती विभागातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे .या संदर्भात जीवन प्राधिकरणाचे अभियंता सुशील पाटील यांनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाणी टंचाई नाही. परंतु महावितरणकडून सुरू असलेले भारनियमण आणि नेहमी वीज खंडित होत असल्यामुळे प्राधिकरणाच्या टाक्या पाण्यानी भरत नाही. याचा त्रास नळ ग्राहकांना होत आहे. तसेच काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असताना वारंवार पाईपलाईन फुटत असल्यामुळेही प्राधिकरणाला पाणी पुरवठा करण्यास अडचण येत आहे, असे सांगितले.या अडचणी समजून घेत वीज वितरण विभागाने व रस्ता बांधकाम करणाºयांनी सहकार्य केले तर पाण्याचा पुरवठा सुरळीत होऊ शकेल प्राधिकरणाकडे पाण्याची कमतरता नाही. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे पाणी टंचाई सुरू आहे. फोडलेली पाईपलाईन बुधवारला सकाळपासून जोडण्याचे कार्य अभियंता पाटील यांच्या उपस्थितीत सुरू होते.
बल्लारपुरात चार दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:11 AM
मागील चार दिवसांपासून शहरातील नळधारकांना अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे.
ठळक मुद्देपाईपलाईन फोडली : नागरिकांत रोष, महावितरणचाही खोडा