शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली : बळीराजा हवालदिल
निलेश झाडे
गोंडपिपरी : सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. वैनगंगा, वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट शेतात शिरले. नदीकाठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे.
गोंडपिपरी तालुक्यात सलग चार दिवस जोरदार पाऊस बरसला. पावसाची वाट बघणारे शेतकरी सुखावले. नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांवर मात्र संकट कोसळले आहे. संततधार पावसाने वैनगंगा आणि वर्धा नदी फुगली आहे. लहान-मोठे नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदी, नाल्यातील पाणी थेट शेतात शिरले आहे. शेतीपिके पाण्याखाली आहेत. पिके कुजून जाण्याचा धोका वाढला आहे. तालुक्यातील पोडसा, वेडगाव, हिवरा, सकमुर, किरमिरी, दरूर, अळेगाव, नंदवर्धन, शिवणी, तारसा गावांना मोठाच फटका बसल्याची माहिती आहे. पूर कायम राहिला तर प्रभावित क्षेत्राचा आकडा वाढू शकेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
कोट
नदीकाठी असलेली शेती पाण्याखाली आली आहे. अळेगाव, हिवरा, पोडसा गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने प्रभावित झालेल्या क्षेत्राची पाहणी करून नुकसान भरपाईची मदत त्वरित द्यावी.
-तुकाराम झाडे, अध्यक्ष तालुका काँग्रेस गोंडपिपरी
240721\1114-img-20210724-wa0063.jpg
शेती