प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा पावसाने वेळोवेळी शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. शेतीला आवश्यक पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाने अचानक दगा दिल्याने राजुरा तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती पाण्याअभावी वाळायला लागली आहे. परिसरात अमलनाला सिंचन प्रकल्प आहे. परंतु धरणाचे पाणी शेतीला अद्यापही सोडले नसल्याने या धरणाचा फायदा केवळ खासगी कंपन्यांनाच होत आहे.निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया कोरडवाहू शेतीचे दिवस आता संपले आहे. पाणी असेल तरच आता शेती पिकते हे सर्वांना माहित असूनही ज्या आशेवर शेतीला पाणी मिळण्यासाठी सिंचन प्रकल्प बांधला, त्या अमलनाला धरणाचे पाणी अद्यापही राजुरा तालुक्यातील पाचगाव, पांढरपोणी, चंदनवाही, मंगी, खैरगुडा, परिसरातील शेतात सोडले नाही. शेतीला सध्या सिंचनाची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु संबंधित विभागाने अजूनही कॅनलची दुरूस्तीच केली नाही. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून आहे. तर काटेरी झुडपांनी अतिक्रमण केल्याने शेतीला पाणी पोहोचणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शेतीवर शेतकऱ्यांनी यंदा अतोनात खर्च केला आहे. परंतु शेतकऱ्यांना निसर्गानेही दगा दिल्याने यावर्षी उत्पादनात मोठी धट होणार आहे. पाचगाव, मंगी, चंदनवाही पांढरपौणी, खैरगुडा परिसरात अमलनाला धरणातून शेतीला पाणी सोडण्यासाठी कॅनलद्वारे पाणी शेतात पोहचण्याची व्यवस्था केली. लाखो रूपये खर्च करून कॅनल बांधले. मात्र संबंधित विभागाने अद्यापही कॅनलची दुरूस्ती केली नाही. मग या विभागाचे जबाबदार अधिकारी अनभिज्ञ कसे?एकीकडे शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न चालविले जातात. तर दुसरीकडे अंमलनाला धरणातून शेतीला पाणी सोडण्याचे सौजन्य कोणत्याही लोकप्रतिनिधींनी दाखविले नाही. त्यामुळे धरणांचे पाणी शेतीला सोडण्याची मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबूलवार, रूपेश गेडेकर, दशरथ भोयर, सुधाकर गेडेकर, तिरूपती इंदूरवार, किसन पिंपळकर व शेतकऱ्यांनी केली आहे.धरणांचा आर्थिक लाभ खासगी कंपन्यांनाचराजुरा - कोरपना तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी, यासाठी अमलनाला धरण बांधण्यात आले. मात्र या धरणातून शेतीला पाणी सोडण्याऐवजी अधिक पाणी परिसरातील सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जाते. त्यामुळे या धरणाचा शेतीला फायदा काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.अमलनाला धरणाचे पाणी अद्यापही शेतीला सोडले नाही. अथवा कॅनलची दुरूस्तीही करण्यात आली नाही. त्यामुळे पाण्याअभावी कोरडवाहू शेतातील पिके वाळायला लागली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन धरणाचे पाणी शेतीला सोडण्याची व्यवस्था करून द्यावी.-गोपाल जंबूलवार,उपसरपंच, पाचगाव
धरणांचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 10:21 PM
यंदा पावसाने वेळोवेळी शेतकऱ्यांना हुलकावणी दिली. शेतीला आवश्यक पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाने अचानक दगा दिल्याने राजुरा तालुक्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू शेती पाण्याअभावी वाळायला लागली आहे. परिसरात अमलनाला सिंचन प्रकल्प आहे. परंतु धरणाचे पाणी शेतीला अद्यापही सोडले नसल्याने या धरणाचा फायदा केवळ खासगी कंपन्यांनाच होत आहे.
ठळक मुद्देकॅनलची दुरुस्तीच नाही : अमलनाला धरणाचे पाणी शेतात केव्हा सोडणार ?