लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती भूजल सर्व्हेक्षण विभागाने दिली आहे.भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून दरवर्षी वर्षांतून तीनदा भूजल पातळीची नोंद घेतली जाते. या अहवालातून त्या गावांना, तालुक्यांना पाणी वापराबाबत सूचना मिळत असतात. त्यामुळे प्रशासनही त्या आधारे पाण्याचे नियोजन करीत असते. दरवर्षी मार्च व जुलै महिन्यात होणाºया सर्व्हेक्षणातून पाणी पातळीत घट दिसून येत असते. मात्र आॅक्टोबर महिन्यात होणाºया सर्व्हेक्षणात पाणी पातळीत वाढ झालेली दिसते. मात्र यावर्षी कमी पावसामुळे आॅक्टोबर महिन्यातच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने घटल्याचे समोर आले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिला दिला. त्यामुळे पेरणीची कामे उशिराने झाली. तब्बल महिनाभराने पाऊस पडला. मात्र पावसात सातत्य नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांनाही सरासरी गाठता आली नाही. त्यामुळे सध्या अनेक सिंचन प्रकल्पांनी आताच तळ गाठले आहे. यामुळे सिंचन प्रकल्पांतून नळ योजनांना होणारा पाणीपुरवठा प्रभावित होत असून आतापासूनच नियोजन आवश्यक आहे.जिल्ह्यात काही दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझीम पावसाची हजेरी लागत असल्याने या पावसाने शेतपिकांना फायदा होत आहे. मात्र सिंचन प्रकल्प व नदी, नाले कोरडे असल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी समस्या उद्भवण्याची चिन्ह आहेत.
पाणी पातळी दीड मीटरने घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:57 PM
यावर्षी संपूर्ण पावसाळा गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५३.३० टक्के पाऊस झाला असून या कमी पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी तब्बल दीड मीटरने घटल्याची माहिती ....
ठळक मुद्देजिल्ह्यात ५३.३० टक्केच पाऊस : उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता