शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पाण्याची मोबाईल तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:21 PM

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल अ‍ॅपद्वारे पाणी स्त्रोतांचे सर्व्हेक्षण व सार्वजनिक वापराचे पाणी नमुने गोळा करण्याची मोहीम जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे १ मार्च ते ३१ मे २०१८ या कालावधीत राबविली जात आहे.

ठळक मुद्देनेट कनेक्शनशिवाय माहिती अपडेट : जिल्ह्यातील १४,९९४ पाणी स्त्रोतांची तपासणी होणार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल अ‍ॅपद्वारे पाणी स्त्रोतांचे सर्व्हेक्षण व सार्वजनिक वापराचे पाणी नमुने गोळा करण्याची मोहीम जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे १ मार्च ते ३१ मे २०१८ या कालावधीत राबविली जात आहे. ही मोहीम जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची वर्षातून दोनवेळा रासायनिक व जैविक तपासणी ही भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेकडील प्रयोगशाळेत केली जात असते. महाराष्ट्र रिमोट सेन्सींग अप्लीकेशन सेंटर नागपूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे अक्षांश आणि रेखांश व त्यांची ठिकाणे यांची अचुक माहिती मोबाईल अप्लीकेशनद्वारे घेण्यात आली आहे. १ मार्च २०१८ ते ३१ मे २०१८ दरम्यान जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे पाणी नमुने ग्रामसेवक, जलसुरक्षक, बीआरसी, पाणी गुणवत्ता सल्लागार यांच्या मदतीने गोळा करण्यात येणार आहेत. यात पाणी पुरवठा योजना, हातपंप, नळ योजना यांचा समावेश आहे. अशा एकूण १४ हजार ९९४ स्त्रोतांबद्दलची माहिती गोळा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींतर्गत कार्यरत असणाºया जल सुरक्षकांना मोबाईल अ‍ॅप हाताळणीचे तालुका स्तरावर प्रशिक्षण पाणी गुणवत्ता तज्ज्ञ अंजली डाहुले यांनी दिले आहे.अशी आहे प्रक्रियाया मोबाईल अ‍ॅपमध्ये सर्व गावातील पाणी स्त्रोतांची अद्यावत माहिती आहे. या अप्लीकेशनचा वापर करतेवेळी जीपीएस सुरू केल्यानंतर स्त्रोतांच्या १०० मीटर अंतरामध्ये गेल्यानंतर त्याचा रंग बदलत जातो व त्यानंतर विस्तार अधिकारी, जलसुरक्षक, बीआरसी, उपविभागीय पाणी गुणवत्ता तज्ज्ञ किंवा अन्य अधिकारी व कर्मचारी यांना त्या स्त्रोतांचा फोटो काढून अपलोड करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांची तपासणी सोईस्कर व अद्यावत होणार आहे.साथीच्या रोगांवर बसणार आळाग्रामीण भागातील सर्व स्त्रोतांची माहिती अद्यावत असल्यामुळे सर्व स्त्रोतांची वेळीच तपासणी करून व त्याची माहिती प्रयोगशाळेमार्फत तात्काळ आॅनलाईन केली जाईल. दूषित आढळलेल्या स्त्रोतांवर वेळीच उपाययोजना करून साथीच्या उद्रेकास आळा बसेल.तालुकानिहाय पाण्याचे विविध स्रोतबल्लारपूर-४२५, भद्रावती-४६४, ब्रह्मपुरी-१२९७, चंद्रपूर-८९३, चिमूर-१८९७, गोंडपिपरी-७२८, जिवती-४४०, कोरपना-७०८, मूल-११७४, नागभीड-१६१७, पोंभूर्णा-६८५, राजुरा-७७९, सावली-१४१४, सिंदेवाही-१२६०, वरोरा-१२१५ असे तालुकानिहाय पाणी स्रोत असून सर्वांचीच तपासणी करण्यात येणार आहे.