राजू गेडाम।आॅनलाईन लोकमतमूल : मूल शहराला पाणी पुरवठा करणारी पाच कोटी ७१ लाख रुपयांची योजना हरणघाट येथील वैनगंगा नदीवरुन कार्यान्वीत करण्यात आली आहे. मात्र यावर्षी पाणी कमी पडल्याने वैनगंगा नदीतील पात्र मार्च महिन्यांतच कोरडे पडले आहे. त्यामुळे मूल शहराला पाणी टंचाईच्या सावटातून बाहेर काढण्यासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी व नगर प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असून नदी पात्रात खोल खड्डा करून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ही स्थिती बघता, शहरात पाणी टंचाई भासणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.मूल नगर परिषदेच्या सन २०११ च्या जनगनेनुसार मूलची लोकसंख्या २५ हजार असली तरी सद्यास्थितीत ३० हजारापर्यंत लोकसंख्या पोहचली आहे. त्यानुसार १०० मि.मी. पाणी लक्षात घेता ३० लाख लिटर पाणी पुरवठा दर दिवशी शहराला आवश्यक आहे. मात्र दहा लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यापेक्षा कमी पाणीपुरवठा झाला. तर पाण्यासाठी शहरवासियांचा उद्रेक होणे स्वाभाविकच आहे.सद्याची पाण्याची टंचाई लक्षात घेता गोसीखुर्द प्रकल्पातील पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडून यावर्षी मूल शहराची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चिचडोह प्रकल्पाचे काम सुरू असल्याने या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग यावर्षी होणार नाही असे दिसते.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पाणी पुरवठा सभापती विद्या बोबाटे, नगरसेविका प्रभा चौथाले, पाणी पुरवठा लिपिक विनोद येनूरकर यांनी वैनगंगा नदीवरील पाणी पुरवठा योजनेला भेट दिली.दरम्यान पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर चर्चा केली. शहर वासियांना पाणी मिळावे यासाठी नदीवर खोल खड्डा करून उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले त्यामुळे तात्पुर्ती पाण्याची सोय झाली आहे. मात्र उन्हाची तीव्रता बघता एप्रिल मे महिन्यांत मूलवासियांवर पाणीटंचाईचे संकट उद्भवण्याचे चित्र दिसत असले तरी, शहरातील पाणी पुरवठा संदर्भात न.प. पदाधिकारी व प्रशासन संवेदनशिल असल्याचे दिसून येत आहे.मूल शहराला पाणी पुरवठा वैनगंगा नदीवरुन केला जातो. मात्र यावर्षी मार्च महिन्यातच नदी कोरडी झाली आहे. पाणी टंचाई लक्षात घेता पाणी वाहत असलेल्या ठिकाणी खड्डा खोदून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यात बंधारा देखील बांधण्याची योजना आहे. तसेच गोसीखुर्द प्रकल्पातील पाणी नदीत सोडण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे.- रत्नमाला भोयर, नगराध्यक्ष,मूलवैनगंगा नदीवरील नदीचे पात्र कोरडे झाल्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. याबाबत गोसीखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यांना पत्र देऊन प्रकल्पाच्या पाणी द्यावे, यासंदर्भात चर्चा सुरु आहे. पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून मूल शहराच्या पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जाईल.विजयकुमार सरनाईकमुख्याधिकारी न.प. मूल
मूल शहरात पाणी टंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:34 PM
मूल शहराला पाणी पुरवठा करणारी पाच कोटी ७१ लाख रुपयांची योजना हरणघाट येथील वैनगंगा नदीवरुन कार्यान्वीत करण्यात आली आहे.
ठळक मुद्देवैनगंगा नदी कोरडी : नगरपालिकेचे प्रयत्न सुरु