राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यात ९३ ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यापैकी २७ गावांत पाणी टंचाईची आहे. तर चिमूर शहरातील काही वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागविली जात आहे.आज घडीला चिमूर तालुक्यातील एकाही गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत नसल्याचे कागदोपत्री असले तरी बऱ्याच गावांत पाणी टंचाई आहे. येत्या काही दिवसामध्ये पाणी टंचाईचे उग्र रुप दिसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागणी लक्षात घेता टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.चिमूर शहरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने वडाळा, पिंपळनेरी, खरकडा, सोनेगाव-बेगडी यागावांसह अकरा प्रभागात पाणी टंचाई आहे. नगर परिषदेद्वारे टँकरने पाणी पुरवठा करणे सुरु केले आहे. मात्र अपुरा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. याठिकाणी शासनाच्या नियमांना हरताळ फसल्या जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघड केले आहे. टँकर चालकाकडे लाक बुक उपलब्ध असले तरी टँकरवर यंत्रणेचे बॅनर व जीपीएस यंत्रणा लावण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहेमागील तीन वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या नगरपरिषदेची लोकसंख्या १५ हजार असून नगर परिषदेमध्ये सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या निर्मितीनंतर टंचाई निर्माण झालेल्या वडाळा, पिंपळनेरी गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. मागील पावसाळ्यात अत्यल्प कोसळलेल्या पावसामुळे शहरालालगत असलेल्या उमा नदीचे पात्र सध्या उथळ झाले आहे .
चिमूरमध्ये २७ गावात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:46 AM
तालुक्यात ९३ ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यापैकी २७ गावांत पाणी टंचाईची आहे. तर चिमूर शहरातील काही वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागविली जात आहे.
ठळक मुद्दे११ प्रभागात पाणीपुरवठा : जीपीएस प्रणालीचा पत्ताच नाही