सावली : येथील जलप्रादेशिक योजनेचा पाणीपुरवठा मागील दीड महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे हिवाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत अनेकदा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. मात्र रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने पाईपलाईन फुटली असल्याचे सांगून वेळ मारून नेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
अपघातानंतरही स्टंटबाजी सुरू
चंद्रपूर : दुचाकीद्वारे स्टंटबाजी करताना चंद्रपूर येथे अपघात झाल्याने एकजणी गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर वाहतूक विभागाने कारवाईची मोहीम सुरु केली होती. त्यामुळे काही दिवस दुचाकीद्वारे स्टंटबाजी करणे बंद झाले होते. मात्र मोहीम थंडी होताच दाताळा मार्गावर पुन्हा स्टंटबाजी सुरु झाली आहे. याकडे वाहतूक विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.