ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात जे हातपंप नादुरुस्त आहेत, शिवाय जे नळ बाधित झालेले आहेत, अशी १५ कामे मंजूर करण्यात आली आहेत. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या शीर्षकाअंतर्गत ११ ग्रामपंचायतींना कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, ज्या ग्रामपंचायतीची कामे मंजूर झाली आहेत, त्यांनी त्वरित काम करून घ्यावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत. २१ गावांना जिल्हा खनिज विकासनिधी अंतर्गत शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या संयोगाचे काम मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे.
यामध्ये मुख्यत्वे तळोधी (खुर्द), जुगनाळा, गांगलवाडी, वांद्रा माल, डोंगरी येथे पूरक वाढीव नळयोजनेचे काम मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. एकंदरीत पिण्याच्या पाण्याच्या समस्येसंदर्भात सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल पाणी पुरवठा विभागाच्या स्तरावरून सांगितले जात आहे. संबंधित विभागाकडून चांगले कार्य होत असल्याने तालुक्यातील जनता समाधान व्यक्त करीत आहे.