लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही: तालुक्यातील कळमगाव, जामसाळा, सिंगडझरी, कुकडहेटी येथील चार गावांचा पाणी पुरवठा मागील चार दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये विभागाबद्दल रोष व्यक्त होत आहे.यंदा तालुक्यात अल्प पाऊस पडल्याने शेतीचेही प्रचंड नुकसान झाले़ दरम्यान, आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे़ कळमगाव, जामसाळा, सिंगडझरी, कुकडहेटी या गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा केला जात नाही़ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली़ मात्र, पाणी पुरवठा ठप्प होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही़ त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे़पाईपसाठी निधी प्राप्त होवून निविदा काढल्यानंतरच कामाला सुरुवात होईल, असे बोलले जाते. तिथंपर्यंत जवळपास चार गावांची लोकसंख्या वर्षागणिक वाढतच आहे़ मात्र, पुरेसा पाणी पुरवठा होत नाही़ न् त्यामुळे या गावात हिवाळ्यातच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ मोहाळी, जामसाळा कळमगाव, सिंगडझर हीे गावे जंगल परिसरात आहेत़ या गावांमध्ये पट्टेदार वाघाची दहशत पसरली आहे़ त्यामुळे रात्रीच्या सुमारास सार्वजनिक बोरवेल व विहिरीवर जाणे कठीण झाले़ गावातील सर्वच कुटुंबे नळयोजनेवर अवलंबून आहेत़ त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना केली केली पाहिजे़ आता लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे़ आधीच विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली़ अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे़ पाऊस कमी पडल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले़ या गावात धानाचे उत्पादन घेतले जाते़मात्र, पाऊस कमी पडल्याने उत्पन्नात मोठी घट झाली़ शिवाय, जनावरांनाही पिण्याचे पाणी न मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी आहे़
चार गावांचा पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:40 AM
तालुक्यातील कळमगाव, जामसाळा, सिंगडझरी, कुकडहेटी येथील चार गावांचा पाणी पुरवठा मागील चार दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये विभागाबद्दल रोष व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देग्रामस्थांचे हाल : पुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी