प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील भूमीगत व खुल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे. वेकोलि कोळसा खाणीत पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याने परिसरातील पाण्याची पातळी खाली गेली आहे.गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव, चिंचोली, परिसरात वेकोलिच्या खुल्या व भूमिगत कोळसा खाणी आहेत. वेकोलि प्रशासनाने पाण्याचा प्रचंड उपसा सुरू केला. त्यामुळे अनेक गावांत टंचाई निर्माण झाली आहे. हातपंप, बोअरवेल आटले आहेत. दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर हाच प्रकार घडतो. पाण्यासाठी गावकऱ्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. वेकोलिने कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग केली जाते. परिणामी, शेतातील बोअरवेल, घरगुती हातपंपांना धक्का बसून त्या बंद पडत आहेत. वेकोलिच्या मनमानी कारभारामुळेच गावकºयांना नेहमी त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी अल्प पाऊस पडला. त्यामुळे या परिसरातील पाण्याची पातळी दिवाळीपासूनच खालावली. जनावरांना प्यायला पाणी नाही. नदी व नाले कोरडे पडले. वेकोलिने मनमानी उपसा सुरू केल्याने परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वेकोलिच्या खाणी सुरू होण्यापूर्वी गावात पाणीटंचाई नव्हती. मात्र, कोळसा खाणी सुरू होताच पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. परिसरातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वेकोलिवर प्रतिबंध घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.भाजीपाला पिकांनाही फ टकागोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव व चिंचोली परिसरातील अनेक शेतकरी विविध पिकांसह भाजापाल्याची पिकेही घेत आहेत. पारंपरिक शेतीला टाळून नगदी पिकांंकडे त्यांचा कल वाढू लागला. काही शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी खोदल्या. तर काहींनी स्वबळावर विहिर खोदून विविध पिके घेण्याचे धाडस केले. मात्र, वेकोलिच्या मनमानी कारभारामुळे या परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या. अनेक हातपंप बंद झाले. त्यामुळे भाजीपाल्याची पिके धोक्यात आली आहेत. बºयाच शेतकºयांनी कर्ज काढून शेती केली. उत्पन्नच झाले नाही तर कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न पुढे आला. वेकोलिने बेसुमार उपसा बंद केला नाही तर आंदोलन करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घालावामार्च महिना सुरू झाल्यापासूनच सात गावांमध्ये पाणी टंचाई सुरू झाली. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे उन्हाळा कसा काढावा, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींनी वेकोलिच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळ नेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोळसा खाणीमुळे ‘पाणीबाणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 11:39 PM
राजुरा तालुक्यातील भूमीगत व खुल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे. वेकोलि कोळसा खाणीत पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याने परिसरातील पाण्याची पातळी खाली गेली आहे.
ठळक मुद्देखाणीत पाण्याचा उपसा : वेकोलि परिसरातील सात गावांवर जलसंकट