आशिष गजभिये।लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : जागतिक कीर्तीच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील झरण जंगलक्षेत्राची राणी अशी ओळख असलेल्या झरणी नामक वाघिणीची व तिच्या तीन बछड्यांची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक आतुर होत आहे. त्यामुळे नवेगाव व अलिझंजा प्रवेशद्वारातून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय खडसंगी अंतर्गत नवेगाव व अलीझंजा प्रवेशद्वारातून ताडोबाच्या राखीव वनक्षेत्रातील झरण वनपरिसरात ही वाघीण आपल्या तीन बछडयांसह वास्तव्यास आहे. मागील काही दिवसांपासून जंगलातील पाणवठे आटल्याने नैसर्गिक पाण्याचा स्रोत असलेल्या कुंभाई येथील पाणवठयावर व झुडूप परिसरात झरणी वाघिणीचे दर्शन होत आहे.याबाबत काही काळापूर्वी सोशल मीडियावर झरणी व तिच्या तीन बछड्यांचे छायाचित्रे व्हायरल झाली होती. तेव्हापासून या वाघिणीची झलक बघण्याकरिता नवेगाव व अलिझंजा गेटवर पर्यटकांची गर्दी होत असून देश-विदेशातील पर्यटक केवळ झरणीलाच पाहण्यासाठी आतूर झाल्याचे त्यांच्याच मागणीवरून दिसून येत आहे. झरणीच्या दररोज होणाºया साइडिंगमुळे नवेगाव (खडसंगी) व अलिझंजा गेटवर पर्यटकाची गर्दी वाढत आहे. पर्यटकासह वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. लगतच असलेल्या जोगामोगा परिसरात मयुरी नामक वाघिणीचेसुद्धा नियमित दर्शन होत आहे. या ठिकाणी नवेगाव प्रवेशद्वारातून मागील तीन महिन्यात १८५१ तर विदेशी ४५ व अलिझंजा गेटवरून १७५८ व विदेशी ९८ पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिल्याची माहिती क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मयुरीची माय झरणीझरणी नामक वाघिणीचा जन्म ताडोबाच्या झरण परिसरात झाला असून सध्या ती सुमारे सहा वर्षांची असल्याचे सांगण्यात येते. या वाघिणीने आतापर्यंत दोन वेळा बछड्यांना जन्म दिला असून तिच्यामुळे व्याघ्र प्रकल्पाला पाच वाघ मिळाले आहेत. झरण परिसरात ती वास्तव्याला असल्याने तिचे झरणी अस नाव पडले असून जोगामोगा परिसरात दर्शन देणाºया मयुरी वाघिणीची ती आई असल्याचे सांगण्यात येते.झुडुपातून बघते तेव्हा पसरते शांततासध्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील राखीव क्षेत्रात येणाºया पर्यटकांना झरणी नामक वाघिणीचे दर्शन होत आहे. जंगल सफारीदरम्यान पर्यटकांची जिप्सी पुढे गेल्यावर कुंभाई परिसरातील झुडपातून झरणी व तिचे तीन बछडे बाहेर निघत पर्यटकांच्या जिप्सीकडे बघतात. याप्रसंगी स्मशानशांतता पसरते. तिला डोळे भरून पर्यटक पाहत असतात.
झरणीची ऐट पर्यटकांना खुणावतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 12:48 AM
जागतिक कीर्तीच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील झरण जंगलक्षेत्राची राणी अशी ओळख असलेल्या झरणी नामक वाघिणीची व तिच्या तीन बछड्यांची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक आतुर होत आहे. त्यामुळे नवेगाव व अलिझंजा प्रवेशद्वारातून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.
ठळक मुद्देनवेगाव, अलिझंजा गेटला पसंती : ताडोबात पर्यटकांची गर्दी वाढली