शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

नलफडी नाल्यात जलसाठा

By admin | Published: April 30, 2017 12:35 AM

राजुरा आणि कोरपना तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची किमया होऊ लागली असून कडक उन्हात नलफडीच्या नाल्यात जलसाठा निर्माण करण्यात आला आहे.

जलयुक्त शिवार : कडक उन्हाळ्यातही ओलावाबी.यू. बोर्डेवार राजुराराजुरा आणि कोरपना तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची किमया होऊ लागली असून कडक उन्हात नलफडीच्या नाल्यात जलसाठा निर्माण करण्यात आला आहे. या जलसाठ्यातून १५ गावांमध्ये सिंचन करण्याची सुविधा निर्माण होईल.राजुरा - कोरपना तालुक्यात राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या निर्देशानुसार जलसाठा वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेमध्ये टेभुर्वाही, सिर्सी, विरूर स्टेशन, खिर्डी, लक्कडकोट, सुमठाणा, साखरवाही, बोरगाव, कापणगाव, तुलाना, घोटा, देवाडा, वरूररोड, चिंचोली, मारडा या गावांचा समावेश आहे. विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत मूर्ती येथील शेतात क्लस्टर नाला खोलीकरण करण्यात आले आहे.राजुरा तालुक्यात पाण्याची पातळी वाढली पाहिजे, यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च करून मजगी, नाला खोलीकरण, बोडी, ढाळीचे बांध धडाक्यात सुरू असून त्यातून ८०० एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेततळे, नाली खोलीकरण, बोडीचे कामे प्रगतीपथावर असून राज्य शासनाने जलयुक्त अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शिवारालगतच्या बंधाऱ्या जवळील नाल्याचे खोलीकरण करून शेती समतोल व गाळ वाहून जावू नये, यासाठी ढाळीचे बांध बांधण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये मजगी कार्यक्रमाद्वारे धानगोट तयार करून दिले जात आहे. शेतकऱ्याच्या शेतामधील जुन्या बोडीचे पुनर्जीवन करून नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत असुन जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नलफडी येथे शेतशिवारात नाला खोलीकरण करण्यात येत आहे. सोन्डो गावालगतच्या शेततळ्यात पाण्याचा साठा दिसत आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्य शासन शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक शासकीय योजना कायान्वित होत आहेत. राजुरा तालुक्यातील सिर्सी येथे यादव आत्राम, लक्ष्मण पेंदोर, देवराव पेंदोर, जलमशाहा कन्नाके, बळीराम पेंदोर, भिमा तोडासाम, विठ्ठल कोवे या शेतकऱ्याचे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बोडीचे नुतनीकरण करून देण्यात आले. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी टी.जी. आडे, कृषी पर्यवेक्षक एस.एम. बोढे, आर.एच. माथारण, बी.एस. चव्हाण, पी.डब्ल्यू. मोहुर्ले, एस.एस. कदम, एस.एच. दातारकर, एम.आर. गंगथळे यांनी योजना प्रभावीपणे राबवून सिंचन क्षमता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.राजुरा विधानसभा क्षेत्रात जलयुक्त शिवार योजना असो की, संघन सिंचन योजना असो. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी विहीर, तलाव, बोडी, मजगीच्या माध्यमातून राजुरा विधानसभा क्षेत्रात जलसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहे.- अ‍ॅड. संजय धोटे, आमदार, राजुरा.