वरोरा : खा. बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते विविध कामांच्या भूमिपूजनाचा समारंभ नुकताच पार पडला. शेगाव( बु. ) येथे आ. धानोरकर यांनी ५० टन क्षमतेचे वे-ब्रिजचे लोकार्पण याप्रसंगी केले.
शेगाव (बु)आणि आजूबाजूच्या भागात वे-ब्रिज नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल वरोरा येथे आणावा लागत असे. त्यामुळे शेगाव परिसरात वे-ब्रिज व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. आ.धानोरकर यांनी याची दखल घेत शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात या ब्रिजचे लोकार्पण केल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे. तसेच खा. बाळू धानोरकर आणि आ. प्रतिभा धानोरकर यांनी ११ कोटी ५० लाखांपेक्षा अधिकच्या विविध विकासकामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन यादरम्यान केले. कोरोनामुळे रखडलेली कामे पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली होती. ग्राम विकास योजना, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना, खासदार आणि आमदार विकास निधीतून ही सर्व कामे केली जाणार आहेत. वरोरा तालुक्यातील कळमगव्हाण, वनोजा, चरुर खटी, वंथली, येवती, जळका आदी गावातील जवळपास ४० कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यात रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, पांदन रस्ते या कामांचा समावेश आहे. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे, उपसभापती देवानंद मोरे, सचिव चंद्रसेन शिंदे, विशाल बदखल, पंचायत समितीचे सभापती रवींद्र धोपटे, उपसभापती संजीवनी भोयर, तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, मनोज दानव, प्रमोद मगरे, बाळू चिंचोळकर, प्रवीण काकडे उपस्थित होते.
===Photopath===
280621\img-20210622-wa0059.jpg
===Caption===
image