जिल्ह्यात बाधित आलेल्या ९ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ४, चंद्रपूर तालुका १, सिंदेवाही १, मूल २ व जिवतीतील १ रुग्णाचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ८३६ वर पोहोचली आहे. ब्रह्मपुरी, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, नागभीड, बल्लारपूर व भद्रावती तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.
सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार १५८ झाली आहे. सध्या १४५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख ८१ हजार १०३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ९३ हजार १७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५३३ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, पात्र नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.