लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तालुक्यात आहेत. मात्र, काही वर्षांपासून वातावरणात अनिष्ट बदल झाल्याने बºयाच प्रजातींनी स्थलांतरण केले. तर काही प्रजाती बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत. त्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत सुुमारे ५० पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संवर्धनासाठी नागरिक व पक्षी मित्रांचे सहकार्य घेवून वनविभागाने जनजागृती मोहीम सुरू केली पाहिजे. कोणतेही पक्षी घराच्या आश्रयाला आले तर मुठभर धान्य टाकल्यास त्या तालुक्यातील अधिवासाशी जुळवून घेतील. शिवाय, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली पाहिजे. वाढत्या वृक्षतोडीमुळे ऋतु चक्रावर वाईट परिणाम होत आहे. तप्त उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसेंदिवस पक्ष्यांचे दैनंदिन जीवन बदलत आहे. कावळा, चिमणी, कवडी, गोच्या सुतार, निलकंठ हरेल. मैना, पोपट, बुलबुल, सूर्यपक्षी, सुगरण, शिकरा, हुळी, गिधाड, खार, घुबड, लालपंखांचे कावळे, घोरपड, रानकोंबडी, देवपक्षी, लावे, तितीर, पिंजरा, कोकीळ, सारस, पानबुडी, ढोकरी, सातभाई हे आदी पक्षी सहजपणे दिसत होते. पण, हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. साधारणपणे मार्च ते जुलै महिन्यात पक्ष्यांच्या विनीचा काळ असतो. मात्र, निसर्गातील बदल व सिमेंटीकरणामुळे पक्ष्यांच्या विणीचा काळ बदलला. त्यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे निरीक्षण पक्षी मित्रांनी नोंदविले. निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखणारा गिधाड पक्षी तालुक्यातून दिसेनासा होत झाला आहे. मांसाहारी अन्न मिळण्यात अडथळा, शिकार, विषप्रयोग तसेच पाण्याअभावी पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हानिकारक बदल झाले आहेत. पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट केला जात आहे. याला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.पेटगाव येथील विद्यालयाचा उपक्रममाणूस आपली तहान सहजपणे भागवू शकतो. मात्र, प्राणी व पक्ष्यांना जीवाचे रान करावे लागते. त्यामुळे पक्ष्यांसाठी अंगण, वृक्ष अथवा सावलीमध्ये पाणी ठेवावे, असे आवाहन पक्षी मित्रांनी केले आहे. शिवाय, पक्ष्यांना वाचविण्यासाठी मातीची भांडी व घरट्यांचे वितरण करण्याचा उपक्रम सुरू केला. पेटगाव येथील ग्रामीण विकास विद्यालयाचे शिक्षक व पक्षीमित्र पुंडलिक बावणे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम सुरू केले. दरवर्षी शाळेच्या मैदानावरील झाडांवर पक्ष्यांची घरटी ठेवली जातात. त्यामध्ये पाणी व अन्नाची व्यवस्था केली जाते. पाणी संपले की लगेच व्यवस्था करण्यासाठी पुढाकार स्वत:हून पुढाकार घेतात. त्यामुळे झाडांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्य करीत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पक्षी व वन्यप्राण्यांचे संवर्धन काळाची गरज आहे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रूजविला जात आहे.
पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 11:35 PM
नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देपक्षीमित्रांमध्ये चिंता : दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण, संवर्धन करण्याची मागणी