शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

वैद्यकीय शिबिरातून कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:21 AM

पाॅझिटिव्ह स्टोरी गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचांदूर येथील पूजा संतोष टोंगे हिने समाजापुढे एक ...

पाॅझिटिव्ह स्टोरी

गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचांदूर येथील पूजा संतोष टोंगे हिने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जन्मगाव टाकळी येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. ८५ घरांच्या गावात जवळपास ६० हून अधिक घरांत कोरोना विषाणूचा प्रसार झाला. अचानक वाढलेले रुग्ण आणि त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधांची निकड निर्माण झाली असताना, पूजाने आवश्यक वैद्यकीय सामुग्रीसाठी लोकसहभागातून निधी उभा करत, कोरोनाग्रस्त टाकळी गावात वैद्यकीय तपासणी व औषधोपचार देण्याचा निश्चय केला.

प्रशासकीय परवानगीने १४ मे रोजी आयुर्वेदिक डॉक्टर्सची चमू गावात जाऊन कोविड १९ बद्दल जनजागृती केली. त्यानंतर, १५ मे रोजी ११० गावकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात ६० हून अधिक कोरोना होऊन गेलेल्या मात्र अनेक तक्रारींनी बेजार असणाऱ्या रुग्णांचा सहभाग होता. सर्व रुग्णांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात आले. पुन्हा १७ मे व २४ मे रोजी गावात वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. तेव्हा रुग्णांच्या तब्येतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसू लागली होती. या दरम्यान रुग्णांचे शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलन करण्यात आले. नुकतेच गावात वैद्यकीय समारोपीय शिबिर पार पडले. आयुर्वेदिक उपचारांचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसल्याचे जाणवले.

ग्रामीण भागात आयुर्वेदिक पद्धतीने कोरोनाग्रस्तांवर प्रभावीपणे उपचार केला जाऊ शकतो. कोविड, कोविडपश्चात व नॉन कोविड अशा एकूण जवळपास १५० रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी व आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात आली, अशी माहिती नागपूरचे डॉ.रचनील कमाविसदार यांनी दिली. या कामात पुण्यातील डॉ.प्रयाग सेठिया, डॉ.भाग्यश्री जिबकाटे, डॉ.राऊत, प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थानिक डॉक्टर्स, आशा वर्कर्स भगत आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याने केलेल्या कामाचे समाधान वाटले. मी माझे सामाजिक कर्तव्य जाणून वैद्यकीय सेवेच्या कामात पुढाकार घेतला, असे मत पूजा टोंगे यांनी प्रतिपादित केले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक सुरेश काकडे, संतोष टोंगे, दशरथ बोबडे, दिलीप भगत, ॲड.दीपक चटप, रूपेश ठाकरे, सरपंच ज्ञानेश्वर टोंगे, अरविंद तरवटकर, काशिनाथ झाडे, अनिल गुप्ता, महेश बंडेकर, प्राजक्ता बाेबडे, विक्रम झाडे, ग्रामसेवक शेख, सुनील वडस्कर, विक्रम रायसिडाम आदींची उपस्थित होती.