लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्पादनासाठी वेकोलिने मातीचे ढिगारे नदी व नाल्याच्या अगदी किनाऱ्यावर टाकले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून पावसाळ्यात बल्लारपूर, सास्ती, गोवरी, नांदगाव, मानाटेकडी गावांना पुराचा धोका उद्भवणार आहे.मागील अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासन हे राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी केले आहे. बल्लारपूर शहराला लागून असलेल्या वर्धा नदीवर गोवरी, सास्ती, पोवनी या भागातील नाल्याच्या किनारी ओव्हरबर्डन उभे केले आहे. यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा निर्माण होवून काही ठिकाणी प्रवाह वळता केला आहे. यामुळे पावसाच्या दिवसात मातीच्या ढिगाºयामुळे पाण्याचा प्रवाह अडून अनेकदा या परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसते. यामुळे क्षणार्धात पूरपरिस्थिती निर्माण होवून नागरिकांना भयावह संकटाचा सामना करावा लागतो.पुरामुळे अनेक संसार उघड्यावर येत असल्याने दरवर्षी प्रकल्पग्रस्त गावकरी उघड्या डोळ्यांनी बघत असतात. मागील आठवड्यात आलेल्या एका पावसाने या भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. वेकोलिने नैसर्गिक जीवंत नाले आपल्या सोयीनुसार वळविल्याने पावसाळ्यात पाणी गोवरी, सास्ती, पोवणी गावाच्या दिशेने लवकर फेकल्या जाते. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती क्षणार्धात पाण्याखाली येवून शेतपिकांचे प्रचंड नुकसान होते. त्याचा फटका बल्लारपूर शहरालाही व शेतपिकांना बसतो.नदी व नाल्याच्या काठावर असलेले ओव्हरबर्डन हटविणे व संरक्षक भिंत बांधणे, यावर जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली होती. वेकोलिला ओव्हरबर्डन हटविण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस महाकाय ढिगारे कायम असून त्यात वाढच होत आहे. निरीच्या चमूने वेकोलिच्या ढिगाºयामुळे पुरस्थिती व प्रदूषण होत असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर बल्लारपूर क्षेत्रातील नदीचा गाळ उपसा करून काठावरील ढिगारे हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पावसाळा तोंडावर आला तरीही वेकोलिने मातीचे ढिगारे जैसे थे ठेवल्याने बल्लारपूर क्षेत्रातील गावांना पूराचा धोका कायम आहे.
वेकोलिच्या माती ढिगाऱ्याने पुराचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:59 PM
बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या खाणीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. कोळसा उत्पादनासाठी वेकोलिने मातीचे ढिगारे नदी व नाल्याच्या अगदी किनाऱ्यावर टाकले आहेत. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होवून पावसाळ्यात बल्लारपूर, सास्ती, गोवरी, नांदगाव, मानाटेकडी गावांना पुराचा धोका उद्भवणार आहे.
ठळक मुद्देबल्लारपूर, सास्ती, गोवरीला धोका : शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येणार