घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी विहिरीतील गाळ काढण्यावर भर दिला आहे. गाळ काढण्यासाठी ३० प्रस्ताव या पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत. तर आठ ग्रामपंचायतींनी नळयोजनेच्या विशेष दुरूस्तीची मागणी केली आहे.सूर्य आग ओकत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी झपाटयाने खाली जात आहे. विहिरी व विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याचे स्रोत पुनरूज्जीवित करण्यासाठी विहिरीतील गाळ काढणे आवश्यक असून त्यासाठीच ग्रामपंचायतींची धडपड सुरू आहे.मिंथूर येथील पाच विहिरींचे गाळ काढण्यात येणार आहे. नवेगाव पांडव येथे २, वलनी येथे ४, कोर्धा येथील ५ विहिरींचे गाळ काढण्यात येणार आहे. कोदेपार येथे २, किटाळी बोरमाळा २, मिंडाळा येथील ४ विहिरींचे तर पळसगाव येथील ५ विहिरींचे गाळ काढण्यात येणार आहे. तळोधी, नवेगाव पांडव, आकापूर, वाढोणा, विलम, मोहाळी, किटाळी मेंढा व वलनी या गावातील नळयोजनांची विशेष दुरूस्ती होणार आहे. तर कोर्धा, विलम, कोदेपार, चिंधीचक येथे नवीन विहिरीस मंजुरी देण्यात आली आहे.कोदेपारात पुन्हा विंधन विहीरपाणीटंचाईसाठी प्रसिद्ध असलेल्या कोदेपार येथे पुन्हा विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. अडीचशे-तिनशे लोकसंख्या असलेल्या कोदेपार येथे याअगोदर सहा विंधन विहिरी खोदण्यात आल्या असल्या तरी यातील केवळ दोन विंधन विहिरी यशस्वी झाल्या आहेत. उर्वरित विंधन विहिरींना पाणी लागलेच नाही. हा पूर्व इतिहास माहित असूनही कोदेपार येथे पुन्हा विंधन विहिरीस प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. आता प्रशासनाने मान्यता दिलीच आहे तर भूवैज्ञानिकांकडून जागेची तपासणी करून किंवा २०० फुटांऐवजी ३०० फुट विंधन विहीर खोदावी. यासाठी शासनाकडून विशेष परवानगी घ्यावी. जेणेकरून विंधन विहिरीवर होणारा खर्च फुकट जाणार नाही. याबाबत जि.प. प्रशासनाने गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे.८१४ विंधन विहिरीनागभीड तालुक्यात नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी ८१४ विंधन विहिरी आतापर्यंत खोदण्यात आल्या आहेत. यातील ७२१ विंधन विहिरींचा पंचायत समितीशी दुरूस्तीचा करारनामा करण्यात आला आहे. या विंधन विहिरींच्या दुरूस्तीसाठी एक पथक कार्यरत आहे. ९३ विंधन विहिरी त्या त्या ग्रामपंचायती स्वतंत्रपणे दुरूस्त करतात.
पाण्यासाठी गावागावातील विहिरींचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:23 PM
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी विहिरीतील गाळ काढण्यावर भर दिला आहे. गाळ काढण्यासाठी ३० प्रस्ताव या पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत. तर आठ ग्रामपंचायतींनी नळयोजनेच्या विशेष दुरूस्तीची मागणी केली आहे.
ठळक मुद्देआठ ग्रा.पं.ला हवी नळ दुरुस्ती : गाळ काढण्यासाठी ३० प्रस्ताव