शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याला काय मिळाले ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 2:18 PM

Chandrapur : संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगांच्या वाट्याला काहीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महायुती सरकारकडून अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या होत्या, संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगांच्या वाट्याला काही मिळाले नाही. मात्र, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झालेल्यांना भरपाईच्या रकमेत मोठी वाढ केल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले तर काँग्रेसच्या नेत्यांनी हा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका केली.

अशी मिळेल आता नुकसान भरपाईताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याच्या घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. वन विभागाकडून प्रतिबंधित उपाययोजना केल्या जातात. मात्र, अजूनही या घटनांना आळा बसला नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याच्या सर्वाधिक घटना चंद्रपूर जिल्ह्यातच घडत आहेत. या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच नुकसान भरपाई वाढविण्यात आली आहे.

मदतपात्र शेतकरीच जिल्ह्यात अत्यल्प■ नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै २०२२' पासून १५ हजार २४५ कोटी ७६ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली. पण, चुकीच्या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील मदतपात्र शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.■ नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मधील अवकाळी पावसामुळे बाधित राज्यातील २४ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना २ हजार २५३ कोटींच्या मदतीची तरतूद करण्यात आली. मात्र, यातही जिल्ह्यातील शेतक- रीसंख्या कमी आहे.

१५ महसूल मंडळातील आशा पल्लवित■ नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा आता दोनऐवजी तीन हेक्टर झाली. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येईल.■ खरीप हंगाम २०२३ करिता ४० तालुक्यांत दुष्काळ तर १ हजार २१ महसूल 3 मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू केल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील १५ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

नवीन विस्तारीत चंद्रपूरची उपेक्षाचसिंचन, पेसा ग्रामपंचायती, लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग, कृषिपूरक उद्योग, शेतकरी कृषी कंपन्या, बेरोजगार व महिलांसाठी स्वयंरोजगार, अनु, जाती, जमाती, ओबीसी व भटक्या जमातीच्या उत्थानासाठी जिल्ह्यात सुरू केलेल्या प्रकल्पांना व योजनांसाठी अर्थसंकल्पात काही मिळाले नाही. नवीन विस्तारित चंद्रपूरचीही उपेक्षा झाली आहे.

२० लाखांवरून २५ लाखवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास २० लाखांवरून आता २५ लाखांची मदत मिळेल. कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख रुपयां- वरून ७ लाख ५० हजार, गंभीर जखमीला १ लाख २५ हजारां- वरून ५ लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास २० हजारांवरून ५० हजार रुपये अशी वाढ झाली. पिकांच्या नुकसान भरपा- ईतील देय रकमेच्या कमाल मर्यादेतही २५ हजारांरून ५० हजारांची वाढ झाली आहे 

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनMaharashtraमहाराष्ट्रmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूर