कोरोनामुळे यंदा बारावीच्या परीक्षा झाल्या नाही. अंतर्गत मूल्यमापन, नववी, दहावी, अकरावी व बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. या परीक्षेपूर्वी तामिळनाडू राज्यातील एका सदस्याने विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक मांडले. याबाबत चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नीट परीक्षा घेतली पाहिजे, अशी भूमिका काही शिक्षकांनी मांडली. बारावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेशाचा विचार होऊ नये तर काहींनी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवनशास्त्र विषयात मिळालेल्या गुणांचाही विचार करण्याची गरज अधोरेखित केली. काही विद्यार्थ्यांनी नीट व सीईटी परीक्षेच्या माध्यमातूनच वैद्यकीय प्रवेश करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
बॉक्स
तामिळनाडू सरकारने पारित केले विधेयक
नीट परीक्षेच्या कारणामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे तामिळनाडू राज्यात नीट परीक्षा घेऊ नये, असा पवित्रा तेथील राज्य सरकारने घेतला. सरकारच्या या भूमिकेला पालक व विद्यार्थ्यांनी समर्थन दिले. विरोधी राजकीय पक्षही विधेयकाच्या बाजूने आहेत.
तामिळनाडू सरकारने नीट परीक्षेबाबत विधेयक पारित केल्याने तेथील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची गरज उरली नाही. अशी जोरदार मागणीही त्या राज्यातील विद्यार्थी केंद्र व राज्य सरकारकडे करीत आहेत.
कोट
शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नीटचा अभ्यासक्रम आव्हानात्मक आहे.
मेडिकल शिक्षण महागडे आहे. मेडिकल प्रवेशासाठी बारावी परीक्षेच्या निकालावर गुणवत्तेची योग्य चाळणी होणार नाही. त्यामुळे नीट रद्द करायची असेल तर अशी एखादी परीक्षा राज्य स्तरावर बोर्डाच्या आधारावर घेतल्यास योग्यच होईल. यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.
-विजय बदखल, संचालक, इन्सपायर, चंद्रपूर
कोट
आता स्पर्धा वाढली आहे. नीट परीक्षा घ्यायला हरकत नाही. मात्र, कोरोना काळाचा अपवादवगळता बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावरही मेडिकलला प्रवेश देण्यास हरकत नाही.
-दिलीप झाडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, चंद्रपूर.
विद्यार्थी काय म्हणतात...
बारावीच्या आधारे मेडिकल प्रवेश दिला तर गुण तसेच आरक्षणाचा काही गुणवंत विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो.
- श्रीधर मालेकर, अंचलेश्वर वॉर्ड, चंद्रपूर
मेडिकल अभ्यासक्रमात प्रचंड स्पर्धा आहे. अशावेळी वैद्यकीय प्रवेशासाठी केवळ बारावीतील गुणांचा विचार करणे पुरेसे नाही.
-मालती कावळे, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर