कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले होते. दरम्यान रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सर्व व्यावसायिकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आपली प्रतिष्ठाने सुरू करण्याची मुभा दिली होती. काही दिवस नियमांचे पालन केल्यानंतर आता अनेक हॉटेल्स, किराणा व इतर व्यावसायिक आपल्या दुकानाचे शटर ४ वाजता बंद करतात. परंतु, त्याची एखादी व्यक्ती दुकानाच्या बाहेर उभी असते. ग्राहक येताच त्याला हवी ती वस्तू बिनदिक्कत दिली जाते. मनपा व जिल्हाधिकारी प्रशासनाने अशांवर कारवाई करण्यासाठी पथक गठित केले होते. त्या पथकाद्वारे काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर आता कारवाई थंडावली असल्याने हवी ती वस्तू हवे त्या वेळेवर शहरात बिनदिक्कत भेटत असल्याचे चित्र आहे.
कोट
सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-विपीन पालिवाल,
अतिरिक्त आयुक्त मनपा
-----
या दुकानांवर लक्ष कुणाचे
प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा तसेच पोलीस विभागाचे पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. परंतु, सद्यस्थितीत तिन्ही पथकांद्वारे कारवाईची मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे.
-------
किराणा हवा की जेवण
सर्व प्रतिष्ठाने ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे प्रशानाचे आदेश आहेत. मात्र सर्वच दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण तसेच किराणा दुकानात किराणा साहित्य मिळत असल्याचे चित्र आहे.
---
हे घ्या पुरावे
जटपुरा गेट
शहरातील जटपुरा गेट परिसरात अनेक दुकाने आहेत. ही सर्व दुकाने सायंकाळी ५ वाजताच्या नंतरसुद्धा सुरू दिसून येतात. काही दुकानाचे शटर अर्धवट बंद असते. तर काही शटर बंद करुन एक माणूस बाहेर ठेवत असतात. ग्राहक येताच त्याला साहित्य देत असतात.
------
मनपा चौक
गोल बाजार परिसरात अनेक प्रतिष्ठाणे आहेत. येथे मोठी गर्दी दिसून येते. सायंकाळी चार वाजताच्या नंतरही येथे हवी ते वस्तू सहज उपलब्ध होत असते.